Agriculture Department : मॉन्सूनमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट, कृषी विभागाकडून आली धक्कादायक माहिती

Monsoon Rain : राज्यात मागच्या काही दिवसांपासून पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु अद्यापही मॉन्सून राज्यातील कोणत्याच जिल्ह्यात दाखल न झाल्याने बहुतांश जिल्ह्यात उपसाबंदीचा निर्णय पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आला.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात मागच्या काही दिवसांपासून पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु अद्यापही मॉन्सून राज्यातील कोणत्याच जिल्ह्यात दाखल न झाल्याने बहुतांश जिल्ह्यात उपसाबंदीचा निर्णय पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आला.

यामुळे शेती पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. याचबरोबर कृषी विभागाने राज्यातील हवामान, उन्हाळी हंगामाची अंतिम पीक परिस्थिती आणि खरीप हंगामाच्या तयारीबाबत राज्य मंत्रिमंडळासमोर अहवाल सादर केला आहे.

Agriculture Department
Monsoon Update 2023: माॅन्सून पुढे कधी सरकणार ? चक्रीवादळ काही तासात किनाऱ्यावर धडकणार?

राज्य कृषी विभागाने सादर केलेल्या या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. विभागाच्या या साप्ताहिक अहवालानुसार, राज्यात ९ जूनपर्यंत केवळ ५.५ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. हा पाऊस सरासरीच्या ६२.३ मि.मी. इतका म्हणजेच ८.८ टक्के आहे.

दरम्यान मागच्या दोन आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात आकाश कोरडे राहिले आहे. तर राज्यातील कोकण आणि अमरावती या दोन जिल्ह्यात तुरळक हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाला.

यानंतर कोल्हापूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये किरकोळ पाऊस  झाला आहे. यानंतर अत्यल्प प्रमाणात लातूर, नागपूर विभागांत पाऊस झाला होता.

तुरळक पाऊस झाल्याने काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली आहे. परंतु पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. राज्यात उसासह खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र १५.९७ लाख हेक्टर इतके आहे. त्यापैकी केवळ ०.७७ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच फक्त १ टक्का क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती समोर आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com