Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या पाचही जिल्ह्यात बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंत पावसाची हजेरी हलकी मध्यम ते दमदार स्वरूपाची होती. त्या तुलनेत गुरुवारी (ता. २०) सकाळपर्यंत पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुसरीकडे गुरुवारी दुपारपर्यंत कुठे ऊन सावलीचा खेळ तर आकाशात ढगांची गर्दी कायम होती.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गत तीन-चार दिवसात प्रथमच गुरुवारी सकाळच्या सत्रात सूर्यदर्शन झाले. दुपारी बारा वाजेनंतर आकाशात पुन्हा एकदा ढगांची गर्दी सुरू झाली. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात जिल्ह्यातील ८३ पैकी ४५ मंडलांत तुरळक हलका पाऊस झाला. सिल्लोड तालुक्यातील पालोद मंडळात सर्वाधिक ४७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. इतर मंडळात ०.३ ते १८ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.
जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ३९ मंडळात तुरळक, हलका पाऊस झाला. पाऊस झालेल्या सर्वच मंडळात ०.३ ते १४.५ मिलिमीटर दरम्यान कमी अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यात पावसाने जवळपास उसंतच घेतली होती. जिल्ह्यातील ६३ पैकी केवळ सहा मंडळात तुरळक पावसाची सर झाली.
लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ५५ मंडळात तुरळक, हलका पाऊस झाला. पाऊस झालेल्या सर्वच मंडळात ०.३ ते १६.३ मिलिमीटर दरम्यान कमी अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली. धाराशिव जिल्ह्यातील ४२ पैकी २६ मंडळात तुरळक, हलका पाऊस झाला. परंडा, भूम, वाशी तालुक्यात पावसाने उसंत घेतली होती.
इतर तालुक्यातील मंडलांमध्ये ०.३ ते १९.८ मिलिमीटर दरम्यान कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली. पडलेला पाऊस पिकांना जीवदान देऊन गेला असला तरी पाणीसाठ्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता इथून पुढच्या काळात दमदार जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.