Pune Dam Agrowon
ताज्या बातम्या

Pune Rain Update : धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात

Team Agrowon

Pune Monsoon News : पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढू लागला आहे. त्यामुळे धरणांच्‍या पाणीपातळीत हळूहळू वाढू लागली आहे. येत्या काळात धरणक्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा आणि कुकडी अशा सर्वच घाटमाथ्यांवर हलक्या ते मध्यम सरी पडत होत्या. त्यामुळे धरणांतील पाण्याच्या पातळीत फारशी वाढ झालेली नव्हती.

पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना लोटला असून, अद्यापही जोरदार पाऊस पडला नसल्याने यंदा धरणे भरतील की नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. हवामान विभागाने येत्या दोन ते चार दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर रविवारपासून (ता. १६) पुन्हा पावसास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये १.६७ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठा २८.९१ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे.

सोमवारी (ता.१७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये कुंडली या घाटमाथ्यावर सर्वाधिक ४४ मिलिमीटर पाऊस पडला. शिरोटा या घाटमाथ्यावर ३९ मिलिमीटर, मुळशी ३७, वळवण ३३, लोणावळा ३१, ठोकरवाडी २० मिलिमीटर पाऊस पडला. मुठा खोऱ्यातील धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. टेमघर धरणक्षेत्रात ४५ मिलिमीटर, पानशेत २६, वसरगाव २५ मिलिमीटर पाऊस पडला असून खडकवासला धरणक्षेत्रात तुरळक सरी पडल्या.

नीरा खोऱ्यातील नीरा देवघर धरणक्षेत्रात ३६ मिलिमीटर, गुंजवणी २३, वडिवळे ३८, पवना २५ मिलिमीटर पाऊस पडला. तर, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, शेटफळ, नाझरे, भाटघर या धरणक्षेत्रांत हलका पाऊस पडला असून वीर धरणक्षेत्रात ढगाळ वातावरण होते.

कुकडी धरणक्षेत्रात आतापर्यंत जोरदार पाऊस पडला नव्हता. परंतु आता धरणक्षेत्रांत पावसाचे प्रमाण वाढले आहे. पिंपळगाव जोगे धरणक्षेत्रात १८ मिलिमीटर, माणिकडोह १९, डिंभे ११, चिल्हेवाडी १० मिलिमीटर पाऊस पडला असून येडगाव, वडज, चिल्हेवाडी, घोड धरणक्षेत्रांत तुरळक सरी बरसल्या. विसापूर, उजनी या धरणक्षेत्रांत अजूनही जोरदार पाऊस पडला नसला तरी अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. परंतु या भागात जोरदार पाऊस झालेला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT