Farming Agrowon
ताज्या बातम्या

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

Sindhudurg Monsoon Update : गेल्या चार-पाच दिवसांच्या तुलनेत सिंधुदुर्गात बुधवारी (ता. १२) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला.

Team Agrowon

Sindhudurg Rain News : गेल्या चार-पाच दिवसांच्या तुलनेत सिंधुदुर्गात बुधवारी (ता. १२) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. गुरुवारी (ता. १३) पहाटेपासून पावसाच्या सरीवर सरी पडत आहेत. पावसामुळे दोन तीन दिवसांपासून खंड पडलेल्या भातरोप पुनर्लागवडीला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. काही भागांत हलक्या तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या सरी पडत होत्या. मात्र त्याचा भातरोप पुनर्लागवडीकरिता उपयोग होत नव्हता.

त्यामुळे भातरोप पुनर्लागवड थांबली होती. अनेक शेतकऱ्यांनी भातरोपे काढून ठेवली आहेत. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. रात्री पावसाच्या चांगल्या सरी जिल्ह्याच्या सर्व भागांत बरसल्या.

त्यानंतर गुरुवारी पहाटेपासूनदेखील पावसाचा जोर वाढल्याचे चित्र आहे. या पावसामुळे शेतीच्या कामांना पुन्हा सुरुवात होईल, भातरोप पुनर्लागवडीत पडलेला खंड थांबण्याची शक्यता आहे.

काही शेतकऱ्यांनी पाऊस पडेल अशा शक्यतेने भातरोपे काढून ठेवलेली आहेत. या रोपांची पुनर्लागवड वेळेत होणे आवश्यक होते. बुधवारी रात्रीपासून पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टळण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT