Indian Agricultural  Agrowon
ताज्या बातम्या

Sustainable Agriculture : भारतीय शेतीच्या शाश्वततेसाठी एकात्मिक शेती पद्धती फायदेशीर

शेतीमधील रासायनिक खतांचा वापर २५ टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे भारत सरकारचे धोरण आहे. रासायनिक खतांचा वापर जितका कमी होईल तेवढे जमिनीचे आरोग्य चांगले राहील.

Team Agrowon

नगर ः एकात्मिक शेती पध्दतीच्या मॉडेलचा प्रसार लहान व मध्यम शेतकऱ्यांपर्यंत झाला पाहिजे. या कमी जमीन धारणक्षेत्र असणाऱ्या शेतकरी वर्गाचे उत्पन्न दुप्पट (Double income) होण्यासाठी, त्याचबरोबर त्यांना शाश्वत उत्पन्न मिळून ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल (Model of Integrated Farming System) फायदेशीर असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (Indian Council of Agricultural Research) नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन विभागाचे उपमहासंचालक डॉ. एस. के. चौधरी यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात एकात्मिक शेती या विषयावरील द्विवार्षिक कार्यशाळा झाली.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन विभागाचे उपमहासंचालक डॉ. एस. के. चौधरी, मृदा व जलव्यवस्थापन विभागाचे सहायक महासंचालक डॉ. ए. वेलुमुरुगण, मोदी पूरम येथील भारतीय शेती पद्धती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. एस. पनवार, बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण संस्थेचे संचालक डॉ. सामी रेड्डी, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, कृषी विद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, मोदीपूरम येथील प्रकल्प समन्वयक डॉ. रवी शंकर, नाबार्डचे पुणे येथील जनरल मॅनेजर डॉ. प्रदिप पराते व एकात्मिक शेती पध्दतीचे प्रमुख कृषी विद्यावेत्ता डॉ. उल्हास सुर्वे उपस्थित होते.

डॉ. चौधरी म्हणाले, की शेतीमधील रासायनिक खतांचा वापर २५ टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे भारत सरकारचे धोरण आहे. रासायनिक खतांचा वापर जितका कमी होईल तेवढे जमिनीचे आरोग्य चांगले राहील.

आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलो तरी जास्त उत्पादन घेण्यासाठी वारेमाप रासायनिक खतांचा वापर होत असतो. पर्यायाने जमिनीतील आवश्यक असणाऱ्या जैविक घटकांचा ऱ्हास होत आहे.

आपली अन्नधान्याची गरज किती आहे याचा विचार व्हायला हवा. आपली शेती ही पर्यावरणाचा भाग असून, पर्यावरणाची शाश्वतता टिकवायची असेल तर जमिनीचे आरोग्य जपावे लागेल.

यावेळी डॉ. सामी रेड्डी व डॉ. वेलुमुरुगन यांनी मार्गदर्शन केले. डॉ. प्रदीप पराते यांनी एकात्मिक शेती पद्धतीविषयी नाबार्डच्या धोरणाविषयी माहिती दिली.

या कार्यशाळेमध्ये विविध पीक पद्धती, सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती या विषयावर बुद्धिमंथन करण्यात आले. यावेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पाच विविध श्रेणीतील उत्कृष्ट केंद्रांना सन्मानपत्रांचे वितरण करण्यात आले.

सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई व सायली बिरादार यांनी तर आभार डॉ. ए. के. पृष्टी यांनी मानले. कार्यशाळेसाठी भारतातील २५ राज्य, केंद्रशासित प्रदेशातून १६० शास्त्रज्ञ उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT