Crop Insurance  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : हिंगोलीत १०५ कोटींचा विमा परतावा

स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणीपश्‍चात नुकसानभरपाई

Team Agrowon

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२२) खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीम बाबीअंतर्गत २ लाख ३ हजार ३७३ हेक्टरवरील पिकांसाठी ९६ कोटी ३५ लाख ५६ हजार ५९३ रुपये विमा भरपाई आणि काढणी पश्चात नुकसान या जोखीम बाबीअंतर्गत १७ हजार ६५२ हेक्टरवरील पिकांसाठी ८ कोटी ७३ लाख ७८ हजार ८२४ रुपये अशी दोन्ही मिळून १०५ कोटी ९ लाख ३५ हजार ४१७ रुपये पीकविमा परतावा मंजूर करण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ३ लाख ४६ हजार ५३ हेक्टरवर पेरणी झाली.एकूण ३ लाख ८० हजार ५०५ शेतकऱ्यांनी २ लाख २२ हजार ८५१ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत अनेक वेळा झालेली अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पीकविमाधारक शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीमबाबीअंतर्गत ४ लाख ४७ हजार ८४२ पूर्वसूचना विमा कंपनीकडे दाखल

केलेल्या आहेत. त्यापैकी ३ लाख ६६ हजार ३९४ शेतकऱ्यांना मंजूर ९६ कोटी ३५ लाख ५६ हजार ५९३ रुपये परतावा वाटप करण्यात आला. काढणीपश्‍चात नुकसान याबाबी जोखीमअंतर्गत २३ हजार ९५८ पूर्वसूचना विमा कंपनीकडे

दाखल केल्या आहेत. त्यापैकी १७ हजार ६५२ हेक्टरवरील पीकनुकसानीबद्दल ८ कोटी ७३ लाख ७८ हजार ८२४ रुपये विमा परतावा मंजूर करण्यात आला. परंतु त्याचे वाटप लवकरच सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.

स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत मंजूर विमा परतावा स्थिती. (क्षेत्र हेक्टरमध्ये, रक्कम कोटी रुपये)


तालुका विमा संरक्षित क्षेत्र परतावा रक्कम

हिंगोली ३४९१२ १६.८३१३

कळमनुरी ४२१२१ २०.५१५३

वसमत ४९३७५ २३.३०५२

औंढा नागनाथ ३६९५६ १६.५४४१

सेनगाव ४०००६ १९.१५९४

काढणीपश्‍चात नुकसान मंजूर पीकविमा परतावा स्थिती. (क्षेत्र हेक्टरमध्ये, रक्कम कोटी रुपये)

तालुका विमा संरक्षित क्षेत्र परतावा रक्कम

हिंगोली २४८४ १.२२९७

कळमनुरी ४९३९ २.४४

औंढा नागनाथ ३१२० १.५४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT