Crop Insurance  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : परभणी जिल्ह्यात ७, तर हिंगोलीत ६ खरीप पिकांना विमा संरक्षण

Kharif Crop : पंतप्रधान पीकविमा योजना परभणी जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या ७ पिकांना, तर हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी या ६ पिकांना लागू आहे.

Team Agrowon

Parbhani News : पंतप्रधान पीकविमा योजना परभणी जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या ७ पिकांना, तर हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी या ६ पिकांना लागू आहे. यंदा (२०२३-२४) पासून ‘सर्वसमावेशक पीकविमा योजना’ राबविण्यात येत आहे.

शेतकरी हिश्‍शाची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १ रुपया विमा हप्ता भरून पीकविमा पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. पीकविमा प्रस्तावासाठी ता. ३१ जुलै ही अंतिम मुदत आहे.

पंतप्रधान पीकविमा योजना खरीप-२०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामासाठी ३ वर्षांसाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. खरीप हंगाम २०२३ मध्ये या योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या ७ अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ-क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.

पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित बँक, पंतप्रधान पीकविमा योजना पोर्टल (PMFBY) पोर्टल https://pmfby.gov.in/ व आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांच्या मार्फत विमा अर्ज करता येतील. शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा संरक्षण घेण्यासाठी विहित मुदतीपूर्वी जवळच्या बँक शाखेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्ता भरून, आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.

कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे. जर कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणार नसेल, तर तसे त्याने विहित मुदतीत कर्ज मंजूर करणाऱ्या बॅंकेस लेखी कळविणे आवश्यक आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ६ पिकांचा समावेश...

पंतप्रधान पीकविमा योजनेत हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी या ६ पिकांचा समावेश आहे. एचडीएफसी जनरल इं. कं. लि. ही विमा कंपनी या योजनेची अंमलबजावणी करणार आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये भरणे सुरू आहे. यासाठी अर्ज भरणे निःशुल्क असून, प्रीमियम सुद्धा फक्त १ रुपया आहे.

जिल्ह्यातील कोणताही केंद्रचालक या व्यतिरिक्त जादा रकमेची मागणी करीत असल्यास शेतकऱ्यांनी आसेफ पठाण (भ्रमणध्वनी क्र. ९५९५९१६१५२ ) ई-मेल : Asefpatel77@gmail.com यांच्याशी संपर्क साधावा.

संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.पीकविमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT