Agrim crop insurance Agrowon
ताज्या बातम्या

Advance Crop Insurance : विमा कंपनीने त्वरित अग्रिम द्यावेत

Crop Insurance Scheme : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या आढाव्यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना यासंदर्भात आदेशत दिले होते.

Team Agrowon

Beed News : जिल्ह्यातील सर्व ८७ महसुली मंडलांमध्ये अग्रिम पीकविमा देण्याचे मान्य करत संबंधित पीकविमा कंपनीस अग्रिम तातडीने वितरित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे दिले आहेत.

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या आढाव्यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना यासंदर्भात आदेशत दिले होते. बीड जिल्ह्यात विशेषतः सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत पावसात दीर्घकालीन खंड पडल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये पावसाच्या खंडाने दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने अंतरिम दिलासा म्हणून शेतकऱ्यांना अग्रिम पीकविमा मिळवून देण्यासाठी सात दिवसांच्या आत महसूल, कृषी व पीकविमा कंपनीने एकत्रित सर्वे करून अहवाल सादर करावा व अग्रिम विमा देण्याचे निर्णय घ्यावा असे निर्देश दिले होते.

त्यानुसार बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी आज अधिसूचना निर्गमित केली. त्यानुसार महसूल, कृषी व पीकविमा कंपनीने निर्देशित केलेल्या सर्व ८७ महसुली मंडलांमध्ये सोयाबीन, उडीद व मूग या पिकांचे सर्वेक्षण करावे, या सर्व महसुली मंडलांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे संभाव्य नुकसान हे सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने निकषानुसार ही सर्वच्या सर्व महसूल मंडळे अग्रिम पीकविम्यास पात्र आहेत.

या सर्व महसूल मंडलांमध्ये तातडीने अग्रिम पीकविमा देण्यात यावा, अशा पद्धतीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी बुधवारी निर्गमित केले आहेत. कृषिमंत्री श्री. मुंडे यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे ८७ महसूल मंडलातील सोयाबीन, मूग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम विमा एक महिन्याच्या आत मिळेल, हे आता निश्‍चित झाले आहे. अत्यंत कठीण काळात हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जातो आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT