Crop Insurance : पावसाच्या खंडामुळे बाधित मंडलांमध्ये अग्रिम मंजूर करा

Rain Update : यंदा (२०२३) पावसाची तूट व दीर्घ खंड यामुळे परभणी जिल्ह्यातील २५ महसूल मंडलांमध्ये १४ ते १९ दिवस पावसाचा खंड पडला आहे.
Crop insurance
Crop insuranceAgrowon

Parbhani News : साची तूट व दीर्घ खंड यामुळे परभणी जिल्ह्यातील २५ महसूल मंडलांमध्ये १४ ते १९ दिवस पावसाचा खंड पडला आहे. परिणामी, सोयाबीनच्या उत्पादकतेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट येणार आहे.

त्यामुळे या मंडलांतील शेतकऱ्यांना देखील पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी माजी कृषी राज्यमंत्री तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ५ लाख ६ हजार १७७ हेक्टर पेरणी क्षेत्रात सोयाबीनचे क्षेत्र ५२.४० टक्के, तर कपाशीचे क्षेत्र ३८ टक्के आहे. सोयाबीनचे पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या संवेदनशील अवस्थेत आहे. शेंगा भरण्याची अत्यंत गरज आहे. जिल्ह्यातील यंदाची पावसाची स्थिती चिंताजनक आहे.

Crop insurance
Crop Insurance : नांदेडमधील ‘त्या’ शेतकऱ्यांना सप्टेंबरमध्ये परतावा मिळणार

ऑगस्ट महिन्यात सोमवार (ता. २८)पर्यंत केवळ ७२ मिलिमीटर पाऊस झाला. जुलै -ऑगस्ट महिन्यांत परभणी, परभणी ग्रामीण, आडगाव, वाघी धानोरा मंडलांमध्ये १४ दिवस, सावंगी म्हाळसा, सोनपेठ, आवलगाव या मंडलांमध्ये १५ दिवस पावसाचा खंड पडला.

Crop insurance
Agrim Crop Insurance : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मंजूर

पिंगळी, बामणी या मंडलांमध्ये १६ दिवस, झरी, टाकळी कुंभकर्ण, गंगाखेड, महातपुरी, पिंपळदरी, हादगाव, मानवत, कावलगाव, पालम, देऊळगाव, चिकलठाणा, वडगाव, शेळगाव या मंडलांमध्ये १७ दिवस पावसाचा खंड आहे. रामपुरी मंडलामध्ये १८ दिवस व कासापुरी, चारठाणा या मंडलामध्ये १९ दिवसांचा खंड पडलेला आहे.

दीर्घ खंडानंतर पडलेल्या अल्प पावसामुळे पिकांना फायदा झालेला नाही. या मंडलातील पीकपरिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पावसाच्या खंडामुळे बाधित सर्व मंडलांतील शेतकऱ्यांना अग्रिम पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी वरपूडकर यांनी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com