Food Processing  Agrowon
ताज्या बातम्या

Food Processing : फळे, देशी गाईच्या दुधापासून मिळणार झटपट आइस्क्रीम

Indigenous Cow Milk : पुणे कृषी महाविद्यालयामध्ये देशी गाईचे दूध व ताजी फळे यांपासून आपल्या डोळ्यांदेखत झटपट तयार होणाऱ्या आइस्क्रीमच्या निर्मिती व विक्री स्टॉल सोमवारी (ता. १८) सुरू करण्यात आले आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे कृषी महाविद्यालयामध्ये देशी गाईचे दूध व ताजी फळे यांपासून आपल्या डोळ्यांदेखत झटपट तयार होणाऱ्या आइस्क्रीमच्या निर्मिती व विक्री स्टॉल सोमवारी (ता. १८) सुरू करण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते या स्टॉलचे उद्‌घाटन करण्यात आले.

या मशिनद्वारे झटपट देशी गाईंच्या आटविलेल्या दुधापासून व पेरू, चिकू, केळी, अंजीर, डाळिंब तसेच कॅडबरी, ओरिओ बिस्कीट, चोको चिप्स अशा विविध पदार्थांपासून आपल्या डोळ्यांदेखत ताजे रोल आइस्क्रीम तयार करण्यात येते.

या प्रसंगी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. सुनील मासळकर, देशी गो संशोधन व प्रशिक्षण प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने, महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. धीरज कंखरे आदी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, की आज-काल बहुतांश आइस्क्रीम व्हेजिटेबल ऑइल वापरून बनविण्यात येणाऱ्या फ्रोजन डेझर्ट प्रकारातली असल्यामुळे आपल्या स्वतःच्या डोळ्यांदेखत ताजे स्वच्छ घटक पदार्थ वापरून तयार करून मिळणारे रोल आइस्क्रीम खायला मिळणे ही पुणेकरांसाठी एक सुंदर पर्वणी ठरणार आहे.

देशी गो संशोधन व प्रशिक्षण प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सोमनाथ माने म्हणाले, की पुणे कृषी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील विक्री केंद्रावर सकाळी दहा ते सायंकाळी पाचच्या दरम्यान या आइस्क्रीमची विक्री करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विक्रीचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT