Food Processing Scheme : प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजनेतून कृषी प्रक्रिया उद्योगासाठी संधी

Agriculture Processing Industry : प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया योजनेतून शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची चांगली संधी आहे.
Pradhan Mantri Food Processing Scheme
Pradhan Mantri Food Processing SchemeAgrowon
Published on
Updated on

Solapur News : प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया योजनेतून शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची चांगली संधी आहे. यातून तांत्रिक साह्यासह आवश्यक सर्व मार्गदर्शन मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले.

मोहोळच्या कृषी विज्ञान केंद्रात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME) अंतर्गत जिल्हास्तरीय क्षमता बांधणी व प्रशिक्षण घटकाअंतर्गत “अन्न प्रक्रिया उद्योजकता विकास” प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी श्री. गावसाने बोलत होते. यावेळी अक्कलकोटच्या प्रियदर्शनी महिला उद्योग समूहाच्या श्रीमती वनिता तंबाके, अॅंग्रोझी ऑर्गॅनिक, पुणेचे संस्थापक महेश लोंढे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे, विषय विशेषज्ञ दिनेश क्षीरसागर उपस्थित होते.

Pradhan Mantri Food Processing Scheme
Food Processing Industry Scheme : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

श्री. गावसाने म्हणाले, की अन्न प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याकरिता प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ येथे राबविले जात असुन, शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, प्रक्रिया उद्योग शेतीला उत्तम जोडव्यवसाय होऊ शकतो. शाश्वत आर्थिक उत्पादनासाठी कृषी मालाचे मूल्यवर्धन करणे गरजेचे असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कृषी प्रक्रिया उद्योजक व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Pradhan Mantri Food Processing Scheme
Food processing industry : आधुनिक ओहमिक, इन्फ्रा-रेड हीटिंग

डॉ. वळकुंडे यांनी यशस्वी प्रक्रिया उद्योजक होण्याकरिता कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ कार्यालयाच्या मदतीने प्रशिक्षनार्थिनी परिपूर्ण माहिती व तांत्रिक प्रशिक्षण घेऊन उद्योग उभारावेत, असे नमूद केले.

अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विषयाचे विषय विशेषज्ञ श्री. क्षीरसागर यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना केवळ उत्पादन करणे महत्त्वाचे नसून, स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आणि व्यवसाय वाढीसाठी अन्न प्रक्रिया उद्योजकांनी आपल्या उत्पादनाचे आकर्षक पॅकेजिंग, ब्रॅंडिंग आणि विपणन करावे, असे मत व्यक्त केले. सुयोग ठाकरे यांनी डिजिटल मार्केटिंग याविषयी सविस्तर माहिती दिली.

तांत्रिक सत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन

तांत्रिक सत्रांत महेश लोंढे यांनी ज्वारी व भरड धान्ये प्रक्रिया, पोषणमुल्ये, उद्योजकता विकास व विपणन संधी या विषयावर, डॉ. तानाजी वळकुंडे यांनी दुग्ध प्रक्रिया व पशुखाद्य निर्मिती उद्योग, फळे व भाजीपाला प्रक्रिया या विषयाचे तज्ञ प्रशिक्षक समाधान खुपसे यांनी बेदाणा, फळे व भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञान, योजनेंतर्गत प्रकल्प अहवाल तयार करणे व मूल्यांकन, वित्त व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com