Kharif Season Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Inputs : निविष्ठांच्या गोदामांची तपासणी संशयाच्या भोवऱ्यात

Kharif Season 2023 : खरीप हंगामाच्या तोंडावर अकोल्यातील कृषी निविष्ठाधारकांच्या गोदामांची तपासणी करण्यासाठी राबविलेली धडक मोहीम संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Team Agrowon

Akola News : खरीप हंगामाच्या तोंडावर अकोल्यातील कृषी निविष्ठाधारकांच्या गोदामांची तपासणी करण्यासाठी राबविलेली धडक मोहीम संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही मोहीम शुक्रवारी (ता.९) सायंकाळी आटोपती घेण्यात आली.

अधिकारी गावी परतले आहेत. एकूणच ही मोहीम नेमक्या कुठल्या उद्देशाने आखली गेली. या चौकशीत काय आढळले, याचे उत्तर कुठलाही अधिकारी द्यायला तयार नाही. याविरुद्ध विरोधी पक्षाच्या आमदारांनी थेट कृषिमंत्र्यांनाच टार्गेट केले आहे.

अकोल्यात ७ ते ९ जून या काळात कृषी निविष्ठांच्या गोदामांची तपासणी करण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात आली. यासाठी राज्यभरातून ४० ते ४५ अधिकारी १४ टीममध्ये विभागले होते. या अधिकाऱ्यांना कुठलीही माहिती देण्याविषयी बंधने घालण्यात आली होती. राज्य तसेच देशात काम करणाऱ्या सुमारे २०० पेक्षा अधिक कंपन्यांची गोदामे अकोल्यात आहेत.

खरीप हंगामासाठी सर्व कंपन्यांनी निविष्ठांचा साठा त्यात करून ठेवलेला आहे. वरिष्ठांच्या निर्देशानुसार कृषी आयुक्तालयाच्या सूचनेवरून ही मोहीम आखण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र ज्या पद्धतीने खासगी व्यक्ती यात ढवळाढवळ करीत होते, ते पाहता ही चौकशीच संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत.

विशेष म्हणजे गेल्या महिन्यात गोदामांच्या तपासणीची मोहीम राज्यभर राबविली गेली. अकोल्यातही तपासणी झाली होती. त्यानंतर पुन्हा खास करून अकोल्यासाठी विशेष मोहीम आखण्याची गरज कुठल्या कारणाने पडली. याबाबत चौकशीतील एकानेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

तर दुसरीकडे ज्या गोदामांची तपासणी करून ती सील केली, त्याविरुद्ध गोदाम मालकांनी कृषी विभागाला निवेदन आहे. जेथे अनियमितता दिसून आली त्यांना ती सुधारण्याची संधी मिळायला हवी होती, अशी मागणी या मालकांनी केली आहे.

तर एका गोदाम संचालकांनी थेट एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्या खासगी व्यक्तीविरुद्ध तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एकूणच हे प्रकरण चौकशीत सहभागी झालेल्यांवर उलटण्याची चर्चा सुरू आहे.

हा वसुलीचा फंडा; आमदारांचा आरोप

या धडक मोहिमेवर अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. हे वैयक्तिक पथक होते काय, अशी विचारणा करीत या माध्यमातून वसुलीचा फंडा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही मोहिमेचे वाभाडे काढले. सध्या शेतकऱ्यांचे रक्त पिण्याचे काम सुरु असल्याची टीका त्यांनी केली. ‘‘हे प्रकरण अत्यंत गंभीर असून मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे. अन्यथा येत्या अधिवेशनात आवाज उठवू,’’ असेही ते म्हणाले.

कृषिमंत्र्यांच्या नजीकच्या खासगी व्यक्तीकडे सूत्रे?

मोहीम हाताळण्यासाठी कृषिमंत्र्यांच्या नजीकचे काही जण गेले तीन दिवस अकोल्यात तळ ठोकून असल्याची खमंग चर्चा कृषी वर्तुळात जोरात सुरू आहे. एक स्वीय सहायक, तसेच कृषी क्षेत्रातील एक जाणकार खासगी व्यक्ती या मोहिमेची सूत्रे हाताळत असल्याची चर्चा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार हात आखडता घेणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Agrowon Podcast: टोमॅटो दरात काहीशी सुधारणा; सोयाबीन दर स्थिरावले, आले दरात सुधारणा, कांदा दर दबावातच तर मेथीचे दर वाढले

Crop Insurance : फळ पीकविमा योजनेतून परताव्यांसाठी निधी मंजूर

Gokul Dudh Sangh : कोल्हापुरातील दूध उत्पादकांना दिवाळी भेट! गोकुळकडून १३६ कोटींचा उच्चांकी दर फरक जाहीर, प्रतिलिटर मिळणार 'इतके' रुपये

Cabinet Decision: मंत्रिमंडळ बैठकीत ५ निर्णय; कर्करोग उपचार, GCC धोरण, वीज कर, महाजिओटेक व फलटण न्यायालय स्थापन

SCROLL FOR NEXT