Abdul Sattar : बोगस बियाणे विकणाऱ्यांना होणार १० वर्षांची शिक्षा ; कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा

Bogus seeds : बोगस बियाणे विकणाऱ्या दुकानदारांवर कृषी विभागाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा लोकांना १० वर्षांची शिक्षा करण्याची तरतूद असणारा कायदा येत्या अधिवेशनात आणण्यात असल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी घोषणा केली.
Abdul Sattar
Abdul Sattaragrowon
Published on
Updated on

Fake seed : राज्यात दरवर्षी पेरणी हंगामाच्या सुरुवातीला बोगस बियाणे विक्रीच्या घटना घडतात. या बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. यापुढे राज्यात बोगस बियाणांची विक्री करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार आहे, अशी घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

शनिवारी अकोला येथे झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते.

Abdul Sattar
Seed Fertilizer Selling : बोगस बियाणे, खत विक्री करणाऱ्यांवर ‘वॉच’

सत्तार म्हणाले, राज्यात दरवर्षी पेरणीच्या हंगामाच्या सुरुवातीला बोगस बियाणे मोठ्या प्रमाणात बाजारात येत असतात. त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक व लूट होत असते. शेतकऱ्याचा एक हंगाम वाया गेला तर त्याचे जवळपास तीन वर्षांचे नुकसान होते असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठकीत बोगस बियाणांबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार अकोला, जालना, परभणी जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने छापेमारी केली. यामध्ये ६८ ठिकाणी अनियमितता आढळून आली.

Abdul Sattar
Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा ; अमोल मिटकरी यांची मागणी

त्यामुळे ज्यांच्याकडे अजून बोगस बियाणे खते असतील, तर त्यांनी तत्काळ नष्ट करावी. अन्यथा राज्यपाल यांच्याकडे मी पूर्ण रिपोर्ट देणार आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहे. त्याचबरोबर अशा लोकांवर किमान 10 वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा येत्या अधिवेशनात आणला जाणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले.

बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेले अधिकारी काही ठिकाणी पैसे घेत असल्याचे आढळून आहेत. अशा लोकांबाबत काही तक्रारी असल्याने संबंधितांनी जिल्हाधिकारी किंवा लाचलुचपत विभागाकडे तक्रार करावी. तसेच खत, बियाणे विक्री केंद्रावर कारवाईत पोलिसांना सहभागी करून घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com