Tea Powder Production Agrowon
ताज्या बातम्या

Tea Powder Production : भारताची चहा पावडर खालच्या दर्जाची, अनेक देशांनी दाखवली नापसंती, ३० टक्क्यांनी घसरली निर्यात

Central Government : सरकारने देशभरातील चहा उत्पादकांना चहाची निर्यात वाढवण्यासाठी गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्याची विनंती केली.

sandeep Shirguppe

Tea Powder Export : भारतातून आंतराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात चहाची निर्यात केली जाते. मागच्या कित्येक वर्षांपासून भारतातून परदेशात जवळपास ४२ टक्के चहाची निर्यात व्हायची ती आता ३० टक्क्यांनी घसरल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. चहा निर्यातीचा भारताचा वाटा ४२ टक्केवरून घसरून १२ टक्क्यांवर आला आहे.

यामुळे सरकारने देशभरातील चहा उत्पादकांना चहाची निर्यात वाढवण्यासाठी गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्याची विनंती केली आहे. वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अमरदीप सिंग भाटिया यांनी इंडियन टी असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेही माहिती दिली.

जागतिक चहा निर्यातीत देशाचा वाटा ४२ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर घसरला आहे. केनिया आणि श्रीलंकेचा जागतिक बाजारपेठेत हस्तक्षेप वाढल्याने भारत ज्या ठिकाणी निर्यात करत होता तिथे आता दुसऱ्या देशांची चहा जातो. यावर भाटिया म्हणाले की, सध्या भारताला चहाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. चहाच्या मळ्यांवर मोठ्या प्रमाणात किटनाशके फवारल्याने भारतातील चहा पावडरला अनेक देशांनी नापसंती दिली आहे.

कीटकनाशकांच्या वापराबद्दल त्रासदायक अहवाल आले आहेत ज्यामुळे चहाच्या निर्यातीला धक्का बसला आहे. दर्जा सुधारला नाही तर निर्यात वाढणे अवघड आहे. यासाठी उद्योग क्षेत्रातून भर द्यावा लागणार आहे. यासाठी टी बोर्डाकडून फॅसिलिटेटरची भूमिकेत असल्याची माहिती भाटीया यांनी दिली.

चहा बोर्डाच्या आकडेवारीनुसार, २०२२ भारताची चहाची निर्यात २३१दशलक्ष किलोग्रॅम होती. परंतु यंदाच्या सिझनमध्ये पहिल्या सहा महिन्यांत ९ कोटी ६५ लाख किलोग्रॅम झाली आहे. जागतिक चहा निर्यात बाजारपेठेत आमचा वाटा ४२% होता, तो आता फक्त १२% वर आला आहे. जागतिक चहाच्या निर्यातीत आपले स्थान पुन्हा मिळवणे आवश्यक असल्याची खंत भाटीया यांनी व्यक्त केली.

दार्जिलिंग चहाचा संदर्भ देत भाटिया म्हणाले की, दार्जिलिंगच्या चहाला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. यामुळे दार्जिलिंगच्या चहाचे मानांकन टिकणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला पश्चिम बंगाल सरकारच्या मदतीची गरज आहे. तसेच चहा पावडरवरील सबसिडी पूर्णपणे रद्द करता येणार नाही आणि ती पुन्हा कशी करता येईल यावर सरकार विचार करत असल्याचे मत भाटीया म्हणाले.

भारतीय चहा उत्पादक मोठ्या प्रमाणात कीटकनाशके वापरतात, याबाबतचे काही अहवाल आल्याने निर्यातीला फटका बसला आहे. चहाचा दर्जा न सुधारल्यास निर्यातीत होणारी घट रोखणे कठीण आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT