Nano Liquid Agrowon
ताज्या बातम्या

Nano Fertilizer : शेतीमध्ये नॅनो खतांचा वापर वाढवा

Nano Urea : सरकारने नॅनो खते-नॅनो युरिया (द्रवरूप) व नॅनो डीएपी (द्रवरूप) नवीन संशोधनाद्वारे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : रासायनिक खताचा संतुलित वापर करून नॅनो खतांचा वापर वाढवा. रासायनिक खतांचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीचे माती परीक्षण करून घेऊन शास्त्रीय दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या मूल घटकांच्या पूर्तीसाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर करून नॅनो खताचा वापर वाढवा.

तसेच पिकांची उत्पादकता वाढण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत व जैविक खतांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे व कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांनी केले आहे.

सरकारने नॅनो खते-नॅनो युरिया (द्रवरूप) व नॅनो डीएपी (द्रवरूप) नवीन संशोधनाद्वारे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. नॅनो युरिया व नॅनो डीएपी द्रवरूप हे ५०० मिली पॅकिंगमध्ये असून, नॅनो युरियामध्ये ४ टक्के नत्राचे प्रमाण तसेच नॅनो डीएपीमध्ये ८ टक्के नत्र व १६ टक्के स्फूरद एकूण वजनाच्या प्रमाणात असते.

नॅनो युरिया व डीएपीद्वारे पिकांना नत्र व स्फुरद फवारणीच्या माध्यमातून उपलब्ध होते. नॅनो खतांची फवारणी केल्यानंतर नत्र व स्फुरद झाडाच्या पानावरील, बिया व मुळाच्या पृष्ठभागावर असणाऱ्या छिद्रांच्या माध्यमातून आतमध्ये प्रवेश करते व पानांच्या पेशींमधील पोकळीमध्ये साठवले जाऊन पिकांच्या आवश्यकतेनुसार झाडाला उपलब्ध होते.

त्यामुळे नत्र व स्फूरद ही अन्नद्रव्ये विहित वेळेत योग्य त्या प्रमाणात पिकांना (८६ टक्के) उपलब्ध होतात. या नॅनो पद्धतीमुळे खतांचा संतुलित वापर होऊन जमीन हवा व पाणी या मूलभूत घटकांना प्रदूषण मुक्त ठेवता येते.

लागवडीच्या खर्चात बचत होते व पिकांच्या भरघोस उत्पन्नाची हमी प्राप्त होते. नॅनो खते-नॅनो युरिया (द्रवरूप) व नॅनो डीएपीचा (द्रवरूप) वापर करताना काळजी घेतली पाहिजे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Cotton Farmers: महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांना पाच वर्षांत पीक विम्यातून मिळाले ३,६५३ कोटी

Property Division: मालमत्ता विभाजन खटल्याच्या निकालानंतरची वाटप प्रक्रिया

Pressmud Fertilizers: प्रेसमड खताला शेतकऱ्यांची पसंती; प्रेसमड खताचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

Maharashtra Politics: सत्तेसाठी वापर साऱ्या आयुधांचा!

Soil Management: माती व्यवस्थापन दुर्लक्षितच!

SCROLL FOR NEXT