Devendra Fadnavis On Thackeray Brothers Alliance: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एकत्रित येण्याचा फार काही परिणाम होईल, असे मला वाटत नाही. मुंबईत कोणीही त्यांच्यासोबत येणार नाही. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड भ्रष्टाचाराचा आहे. निवडणुकीत अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची युती झाली आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. मुंबईकर महायुतीलाचा कौल देतील. मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत. राज्य गाजवणारे नकोत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. .ठाकरेंच्या युतीचा काही फायदा होणार नाही. भावनात्मक मतदान होणार नाही. खरं तर मतदान विकसित मुंबईसाठी होईल, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे..महायुतीतील सर्व लोक मराठी आहेत. आम्ही सर्व मराठी आहोत. आम्ही इंग्रजी आहोत का? असा सवाल बावनकुळे यांनी केला. ''तुम्ही मराठी मराठी करून तुम्ही मराठी भाषेचा अपमान केला. हा काय खोटारडेपणा करताय? त्यामुळे काहीही फायदा नाही. त्यामुळे काही सांगितले तरी फार वाट लागणार आहे. यावेळी उद्धवजींच्या पक्षाला महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात किचिंत बहुमत मिळेल,'' असा टोला त्यांनी लगावला..Thackeray Brothers Alliance: ठाकरे बंधूंच्या युतीची अखेर घोषणा, जागावाटपावर बोलण्यास नकार.बाळासाहेब ठाकरेंना जे पटले नाही ते उद्धव ठाकरे यांनी केले. तशी हजार उदाहारणे आहेत. आता त्यांनी काही तोंडाच्या वाफा करुन फायदा नाही. निवडणूक लढा, कितीही एल्गार केले तरी काही फायदा होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस कधीही जात- धर्मावर आधारित राजकारण करत नाहीत. ते हिंदुत्वाशी कधीही तडतोड करत नाहीत, असेही बावनकुळे म्हणाले. .Uddhav Thackeray: शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या कंपन्यांवर सरकार कारवाई करणार का?; उद्धव ठाकरेंचा सवाल.काँग्रेसची भावना 'मनसे'सोबत युती करण्याची नाही- वडेट्टीवारठाकर बंधूच्या युतीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ''दोन्ही बंधूं एकत्र येत असतील तर नक्की आम्हाला आम्हाला आनंद आहे. आम्हाला दुःख होण्याचे काही कारण नाही. त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना निवडणुकीत यश मिळो, अशी भावना व्यक्त करतो. काँग्रेसची पूर्वीपासूनची भावना 'मनसे'सोबत युती करण्याची नव्हती. शिवसेनेसोबत आणि शरद पवार यांच्यासोबच युती करण्याची भावना कालही होती, आजही आहे. दोन्ही भाऊ एकत्र लढते असले तरी आमचं काय होईल ते आमचे आम्ही बघून घेऊ.'' असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. .मुंबईसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेची युती झाली आहे. आम्ही एकत्र आले आहोत ते एकत्र राहण्यासाठी, असे ठाकरेंनी स्पष्ट केले. दरम्यान, जागावाटपाचा फॉर्म्युला काय ठरला? हे त्यांनी जाहीर केलेले नाही. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.