Wheat Yellowing: सध्या गव्हाचे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. नोव्हेंबरमध्ये पेरणी केलेल्या गव्हामध्ये सध्या आंतरमशागत आणि खतांचा दुसरा हप्ता देण्याचा काळ चालू आहे. अशात कडाक्याची थंडी पडल्याने पिकाला चिलिंग इन्जुरी होत आहे. परिणामी पीक पिवळे पडत आहे. अशा काळात गहू पिकाचे योग्य नियोजन करुन शेतकरी पिकाचं संरक्षण करु शकतात. .तणनाशकाच्या फवारणीनंतर जर गव्हाचे पीक पिवळे पडत असेल तर चिंतेचे कारण नसते. गव्हाचे पीक ५५ दिवसांचे झाल्यावर त्याला १९:१९:१९ खताची २% म्हणजेच २० मिली खत १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. यामुळे पानांचा पिवळेपणा कमी होतो आणि पीक जोमाने वाढते. या लेखासाठी गहू संशोधन केंद्रातील संशोधक डॉ. निलेश मगर यांनी मार्गदर्शन केले आहे..Wheat Rust Disease: गव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स.बऱ्याचदा गव्हाचे पीक थंडीमुळेसुद्धा पिवळे पडते. थंडीमध्ये पडणाऱ्या दवांमुळे पान पिवळी होतात. यालाच इंग्रजीत चिलिंग इन्जुरी असे म्हटले जाते. थोड्या प्रमाणात चिलिंग इन्जुरी असल्यास पीक सहन करु शकते. परंतू जास्त प्रमाणात पाने पिवळी पडत असल्यास खत नियोजनानुसार नत्र खताचा दुसरा हप्ता द्यावा..गव्हाचे तणनियंत्रणसद्यस्थितीत नोव्हेंबरमध्ये पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये आता तणांचे नियोजन करण्याची वेळ आहे. गहू पिकात तण नियंत्रणासाठी यांत्रिक आणि रासायनिक अशा दोन पद्धती वापरल्या जातात.यांत्रिक पद्धतीमध्ये शेतामध्ये गरजेनुसार १ ते २ वेळा खुरपणी तसंच कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो शेत वाफशावर असताना करावी.कोळपणीमुळे जमिनीत हवा खेळती राहते व पिकांची वाढ चांगली होते. कोळपणीमुळे कोरडवाहू क्षेत्रात जमिनीत पडत असलेल्या भेगा बुजून जातात आणि ओल टिकून राहते..रासायनिक तण नियंत्रणअरुंद आणि रुंद पानांच्या तण नियंत्रणासाठी पुढीलपैकी एक तणनाशक पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी गव्हाच्या दोन ओळींमध्ये फवारु शकता. मेटसल्फ्युरॉन मेथाईल २० % डब्ल्यू पी हे तणनाशक एकरी ८ ग्रॅम २०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. किंवा क्लोडिनाफॉप प्रोपार्जिल १५% मेटसल्फ्यूरॉन मेथाईल १% डब्ल्यू पी एकरी १६० ग्रॅम १५० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तसेच तणनाशक फवारल्यानंतर १० ते १२ दिवस गव्हाला पाणी देऊ नये..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.