
New Delhi : येथील ‘इफको’ कंपनीच्या मुख्यालयामध्ये केंद्रिय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी कंपनीने विकसित केलेल्या नॅनो डीएपी (द्रवरूप) खताचे उद्घाटन केले.
बुधवार (ता. २६) रोजी झालेल्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, हे जगातील पहिले नॅनो डिएपी खत असून, नायट्रोजन आणि फॉस्फरसचा उत्कृष्ट स्त्रोत आहे.
समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत स्वप्न साकारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. इफकोने ९ दशलक्ष युनिट्सपेक्षा जास्त खतांचे उत्पादन (Fertilizer Production) केले असून, भारताच्या अन्नधान्य स्वावलंबनात त्यांचे मोठे योगदान आहे
इफकोने नॅनो डीएपीच्या उत्पादनासाठी कलोल (गुजरात), कांडला (ओडिशा) आणि पारादीप येथे युनिट उभारले आहेत. त्यातील कलोलमधून उत्पादन सुरू झाले असून, यावर्षी नॅनो डीएपीच्या ५० दशलक्ष बाटल्यांचे उत्पादन करण्याचे नियोजन आहे.
तीनही प्लॅंट २०२५-२६ पर्यंत कार्यान्वित होतील आणि त्यानंतर ही उत्पादनक्षमता १८ कोटी बाटल्यांपर्यंत जाईल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
या उत्पादनाला कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने खत नियंत्रणाखाली मान्यता दिली असल्याचे इफकोचे अध्यक्ष दिलीप संघानी यांनी सांगितले.
या वेळी ‘इफको’ चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उदयशंकर अस्थी म्हणाले, की नॅनो डीएपी (लिक्विड) हे पर्यावरणपूरक उत्पादन असून, त्यामुळे पिकांची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी प्रभावी ठरू शकते.
नॅनो डिएपीची वैशिष्ट्ये ः
• पारंपारिक डीएपी पेक्षा स्वस्त. डीएपीची ५० किलोची एक बॅग १३५० रु. असून, नॅनो डीएपी (लिक्विड) ची एक बाटली फक्त ६०० रु. मध्ये मिळेल.
• झाडाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रभावी.
• जैविक दृष्ट्या सुरक्षित असून, माती, पाणी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
• यामुळे पारंपारिक डीएपीच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल.
• कमी प्रमाणामध्ये वापर शक्य. त्यामुळे वाहतूक आणि साठवणूक खर्चात बचत होईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.