Nagpur News: शैक्षणिक वेबिनार व पशुचिकित्सा शिबिरांचे आयोजन करणे व पशुसंवर्धन खात्याच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनास वेळोवेळी पत्रव्यवहार करणे, या बाबींवर जोर देण्याचा निर्णय मागासवर्गीय पशुसंवर्धन अधिकारी वेल्फेअर असोसिएशनने घेतला. संघटनेची नवनियुक्त राज्यस्तरीय कार्यकारिणी व नागपूर विभागीय सभेने केलेल्या संयुक्तरित्या आयोजित केलेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. सरपंच भवन येथे ही सभा झाली. .विभागनिहाय बैठका आयोजित करणे, राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना संघटनेच्या कार्याबाबत व सदस्यत्वाबाबत माहिती देणे, जिल्हानिहाय २ ते ३ प्रतिनिधींची नियुक्ती करणे, राज्यभर सदस्यसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, संघटनेची आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी सदस्यांना आवाहन करणे, पदोन्नतीतील आरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करणे, सेवानिवृत्त व विशेष कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करणे,.Animal Husbandry: पशुपालनात खाद्य, आरोग्य व्यवस्थापनाला विशेष प्राधान्य.शैक्षणिक वेबिनार व पशुचिकित्सा शिबिरांचे आयोजन करणे, खात्याच्या प्रलंबित बाबींवर शासनास वेळोवेळी पत्रव्यवहार करणे, संघटनेचे नियमित लेखापरीक्षण करणे या सर्व विषयांवर उपस्थित सदस्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन संवाद साधण्यात आला व त्यांच्या प्रश्नांचे समाधानकारक निरसन करण्यात आले. अध्यक्ष डॉ. मुकेश मर्चंडे यांनीही संघटनेच्या भावी कार्याबाबत मार्गदर्शन करत चर्चेत सक्रिय सहभाग घेतला..Animal Husbandry: लिंग निर्धारित रेतमात्रेचा वापर.या सभेला नागपूर विभागातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये डॉ. कविता मोरे, डॉ. शशिकांत मांडेकर, डॉ. विनोद समर्थ, डॉ. शैलेश महाजन, डॉ. मनोहर लाडूकर, डॉ. अमित लोहकरे, डॉ. विनोद सुरपाम, डॉ. शील इलमकर, डॉ. पराग खोब्रागडे आदींसह इतर सदस्यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राज्य संघटक डॉ. गिरीश गवळी यांनी केले..प्रारंभी महापुरुषांना अभिवादन करून सभेची सुरुवात झाली. या सभेस राज्याध्यक्ष डॉ. मुकेश मर्चंडे, सरचिटणीस डॉ. मुकिंदा जोगेकर, कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल जोंधळे, कोषाध्यक्ष डॉ. सुशील भगत, उपाध्यक्ष डॉ. वैभव आहेर, सहसचिव डॉ. दिलीप शेंगाळ, राज्य संघटक डॉ. गिरीश गवळी, संघटना सल्लागार डॉ. प्रशांत गेडाम, राज्य महिला प्रतिनिधी डॉ. शुभांगी व्यवहारे तसेच केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. सागर कसबे आदी राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अश्विन मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक सरचिटणीस डॉ. मुकिंदा जोगेकर यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.