Milk Prices Agrowon
ताज्या बातम्या

Milk Prices : मदर डेअरीकडून दुधाच्या विक्री दरात वाढ

मदर डेअरीने आता दूध दरात वाढ केली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून जे दूध संकलन केलं जातं त्याच्या खरेदी खर्चात वाढ झाल्यामुळे दरवाढ केल्याचं मदर डेअरीचं म्हणणं आहे.

Team Agrowon

मदर डेअरीने (Mother Dairy)आता दूध दरात वाढ केली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून जे दूध संकलन केलं जातं त्याच्या खरेदी खर्चात वाढ  झाल्यामुळे दरवाढ केल्याचं मदर डेअरीचं म्हणणं आहे.

दिल्ली-एनसीआर परिसरात मदर डेअरीच्या एक लिटर फुल क्रीम दुधासाठी एक रुपया जास्तीचा मोजावा लागणार आहे. मदर डेअरी ही दिल्ली-एनसीआर भागात दूध पुरवठा करणारी मोठी कंपनी आहे. ही कंपनी दररोज ३० लाख लिटरहून अधिक दुधाचा पुरवठा करते. विशेष म्हणजे मदर डेअरीने यंदा चौथ्यांदा दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मदर डेअरीचे म्हणणं आहे की, पशुखाद्याच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांना दुभत्या जनावरांवर जास्त खर्च करावा लागतो. त्यामुळे कंपनीला शेतकऱ्यांकडून जास्त दर देऊन दूध विकत घ्यावं लागतं. त्याचवेळी, मदर डेअरीने असंही म्हटलंय की, ग्राहकांकडून मिळणारा ७५ ते ८० टक्के भाग दूध उत्पादकांना दिला जातो. अशा स्थितीत दुधाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचाच फायदा होणार आहे.

यापूर्वी कंपनीने ऑक्टोबरमध्ये दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रूपयांची वाढ केली होती. मदर डेअरीपाठोपाठ अमूलनेही दुधाच्या दरात दोन रूपयांची वाढ केली होती. 

६४ रुपये प्रतिलिटर दराने विक्री

कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं की, मदर डेअरीने फुल क्रीम दुधाची किंमत एक रुपयाने वाढवून ६४ रुपये प्रति लिटर केली आहे. मात्र, कंपनीने ५०० मिली पॅकमध्ये विकल्या जाणाऱ्या फुल क्रीम दुधाच्या किमतीत बदल केलेला नाही. त्याचवेळी, टोकन मिल्क (मोठ्या प्रमाणात विकले जाणारे दूध) सोमवारपासून ४८ रुपयांऐवजी ५० रुपये प्रति लिटरने विकले जाईल.

मदर डेअरीच्या प्रवक्त्याने सांगितले की, यावर्षी संपूर्ण डेअरी उद्योगात दुधाची मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत दिसून येत आहे. चाऱ्याची किंमत जास्त असल्याने दूध संघालाही शेतकऱ्यांकडून चढ्या दराने दूध खरेदी करावे लागत आहे. याशिवाय प्रक्रिया केलेल्या दुधाची मागणी वाढली आहे. सणासुदीच्या हंगामानंतरही मागणी-पुरवठ्यात तफावत राहिल्याने दुधाचे भाव आणखी वाढलेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : सोयाबीन खरेदीची मुदत निम्मी संपली मात्र २ टक्केही खरेदी नाही; आतापर्यंत केवळ २४ हजार टनांची खरेदी पूर्ण

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी नरमाई ; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर ?

Farmer Producer Company : नवअनंत शेतकरी कंपनीची वाटचाल आशादायी

Maharashtra Election 2024 : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला तारणार?

Hawaman Andaj : थंडीमुळे राज्याला हुडहुडी; राज्याच्या बहुतांशी भागातील कमान तापमानात घट कायम

SCROLL FOR NEXT