Sugarcane cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Cultivation : उस लागवड क्षेत्रात तीन लाख हेक्टरनी वाढ

Sugarcane Season : देशात जुलैमध्ये झालेल्या पावसाने उसाच्या लागवडीत तीन लाख हेक्टर वाढ झाली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : देशात जुलैमध्ये झालेल्या पावसाने उसाच्या लागवडीत तीन लाख हेक्टर वाढ झाली आहे. २८ जुलै अखेरच्या अहवालानुसार देशात ५६ लाख हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली.

खरीप पिकांच्या पेरणीने ८३० लाख हेक्टर क्षेत्र ओलांडले आहे. ऊस व धानाखालील क्षेत्र वाढले आहे. गेल्या वर्षीच्या २३३.२५ लाख हेक्‍टरच्या तुलनेत या वर्षी ४.३३ लाख हेक्‍टरने भातपिकाखालील क्षेत्राची वाढ होऊन एकूण २३७.५८ लाख हेक्‍टरवर भातपिकाची वाढ झाली आहे.

खरीप हंगामाच्या एकूण क्षेत्रापैकी ७६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरीप हंगामाचे एकूण क्षेत्र १०९१.७३ लाख हेक्टर असून, त्यापैकी या कालवधीत ८३०.३१ लाख हेक्‍टरवर पेरणी पूर्ण झाली. तृणधान्ये, भरड तृणधान्ये आणि तेलबियांची पेरणी गेल्या वर्षीपेक्षा जास्त झाली. कडधान्य पिके खूपच मागे पडली आहेत. त्याचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत १२.३२ लाख हेक्‍टरने कमी आहे.

महाराष्ट्रात जुलैमध्ये ऊसलागवड वाढली

महाराष्‍ट्रासह अनेक राज्यांत यंदा मॉन्सूनने उशिरा सुरुवात केली, त्याचा फटका वेळेत पेरण्‍या होण्याला बसला. जुलैच्या उत्तरार्धापासून पेरण्यांची गती अनेक राज्यांत वाढण्‍यास सुरुवात झाली.

पाऊस सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी ऊस लागवडी वाढल्‍या. महाराष्‍ट्र व उत्तर प्रदेशात मुख्यत्वे करून उसाची लागवड जुलैमध्ये वाढली. देशांतील अन्य राज्यांत मात्र उसाच्या लागवडीत फारसा फरक पडला नसल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

आडसाली ऊस लागवडीला प्राधान्य

महाराष्ट्रात जूनमध्‍ये उसाची लागवड पूर्णपणे रखडल्याचे चित्र होते. ऊस उत्‍पादक पट्ट्यातही शेतकरी लागवडीसाठी कचरत होता. गेल्या पंधरवड्यात अनेक ठिकाणी झालेल्या पावसाने ऊस उत्पादक रखडलेल्या ऊस लागवडी उरकत असल्याचे चित्र आहे. ज्या भागात आडसाली ऊस घेतला जातो त्या ठिकाणी शेतकरी लागवडीला प्राधान्य देईल, अशी शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT