Sugarcane FRP : कारखानदारांनी ‘एफआरपी’चे २२५ कोटी थकवले

Sugarcane Season Maharashtra : आता पुढील हंगामही अवघ्या दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपला. पण जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’चे अजूनही २२५ कोटी रुपये थकवले आहेत.
Factory
FactoryAgrowon
Published on
Updated on

Solapur News : जिल्ह्यातील मागचा ऊस गाळप हंगाम संपून चार ते साडेचार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. आता पुढील हंगामही अवघ्या दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपला. पण जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’चे अजूनही २२५ कोटी रुपये थकवले आहेत.

गेल्या हंगामात जिल्ह्यात ३७ कारखान्यांनी ऊस गाळप केले. त्यामध्ये एकूण एक कोटी ८२ लाख २३ हजार ३३९ टन गाळप झाले. त्याची शेतकऱ्यांना देय असलेली एफआरपी चार हजार १८३ कोटी रुपये आहे.

त्यापैकी चार हजार ८७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडलेले दिसत असले, तरीही प्रत्यक्षात तशी स्थिती नाही. काही कारखान्यांनी शंभर टक्क्यांपेक्षा अधिक एफआरपी दिली असल्याने ती एकुणात वजावट होऊन अहवालात जिल्ह्याची थकीत एफआरपी कमी दिसत आहे.

ती वजावट सोडली, तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या एफआरपीचे २२५ कोटी रुपये थकवले आहेत. एकतर पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. खरिपाच्या पेरण्या, ऊस लागवड खोळंबली आहे. अशातच एफआरपी थकल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

Factory
Sugarcane FRP : थकित ‘एफआरपी’ द्या; अन्यथा होणार कारवाई

थकित एफआरपी व्याजासह मिळणार का?

चालू गळीत हंगामातील उसाच्या रिकव्हरीनुसारच एफआरपी देण्याचा निर्णय गेल्यावर्षीच्या फेब्रुवारीत शासनाने घेतला होता. त्यानुसार हंगाम सुरू असताना बेसिक रिकव्हरीप्रमाणे पहिला हप्ता द्यायचा व एफआरपीची उर्वरित रक्कम हंगाम संपल्यावर १५ दिवसांत अंतिम रिकव्हरी निश्‍चित करून द्यायची, असा तो निर्णय होता.

Factory
FRP of Sugarcane : मोठी बातमी! केंद्र सरकारकडून उसाची एफआरपी जाहीर, प्रतिक्विंटलसाठीचा दर निश्चित

त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपी दोन हप्त्यांत मिळणार हे उघडच होते. मात्र जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी शासनाच्या या निर्णयाला कोलदंडा मारला. मुळात उसाचे गाळप झाल्यावर १५ दिवसांत एफआरपीची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना द्यायला हवी, असा कायदा सांगतो.

१५ दिवसांत ती रक्कम न मिळाल्यास १५ टक्के व्याजासह द्यावी, अशी कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील थकित एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना आता व्याजासकट मिळणार का, हा प्रश्‍न आहे.

कारखानानिहाय १५ जुलैअखेरची थकित एफआरपी (आकडे कोटींत)

कारखाना थकित एफआरपी

पांडुरंग १८.६७

सिद्धेश्वश्‍वर १४.८४

संत दामाजी २.७१

सहकार महर्षी १०.५१

विठ्ठलराव शिंदे १८.७६

मकाई २२.६८

सासवड माळी ५.९७

मातोश्री ११.५४

विठ्ठल रिफाइंड ४४.९२

विठ्ठलराव शिंदे ५.४२

भीमा ३८.४५

सहकार शिरोमणी २०.७३

धाराशिव, सांगोला १.३०

श्री शंकर ७.१४

विठ्ठल, वेणूनगर २.८६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com