Sugarcane Farming Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Farming : वाढती थंडीमुळे उसामध्ये साखर भरण्यास मदत

राज्याच्या विविध भागात थंडीने पुनरागमन केल्याने याचा फायदा साखर कारखानदारांना होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून ऊस पट्ट्यामध्ये पारा चांगलाच घसरला आहे.

Team Agrowon

कोल्हापूर : राज्याच्या विविध भागात थंडीने (Cold) पुनरागमन केल्याने याचा फायदा साखर कारखानदारांना (Sugar Mill) होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून ऊस पट्ट्यामध्ये पारा चांगलाच घसरला आहे. वाढती थंडी (Cold Weather) उसामध्ये साखर भरण्यास महत्त्वाची ठरत असल्याने आगामी काही दिवस साखर कारखानदारांसाठी समाधानाचे ठरतील, असा अंदाज आहे.

यंदा सुरुवातीपासूनच घटता साखर उतारा ही कारखानदारांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. देश व राज्य पातळीवरही गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे एक टक्के पर्यंत उतारा कमी आहे. महाराष्ट्रात तर कोल्हापूर वगळता अन्य विभागांमध्ये साखर उतारा दहा टक्केच्या खाली आहे. ऑक्टोबर मध्ये ऊस पट्ट्यामध्ये झालेला तुफान पाऊस उसाची वाढ थांबवून गेला.

पंधरा पंधरा दिवस उसाच्या प्लॉटमध्ये पाणी थांबून राहिल्याने उसाची शेवटच्या टप्प्यातील वाढ अपेक्षित झाली नाही. ज्यावेळी प्रत्यक्षात ऊस तोडणी सुरू झाली त्यावेळी उत्पादनातील ही घट कारखान्यांना दिसून येत आहे. साखर उताऱ्यातही घट दिसून आली. साधारणतः डिसेंबर, जानेवारी हे महिने थंडीचे असतात.

या दिवसात साखर उतारा वाढीची संधी असते. यंदा डिसेंबर महिन्यात मात्र राज्याकडे थंडीने पाठच फिरवली. याचा नकारात्मक परिणाम साखर उतारा वाढीवर झाला. गेल्या वर्षी डिसेंबर २०२१ महिन्यात राज्याचा साखर उतारा सरासरी ९.८० टक्यापर्यंत होता.

डिसेंबर २०२२ मध्ये हाच उतारा ९.३० टक्यापर्यंत खाली आला. विशेष म्हणजे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत गाळप अधिक आहे. तरीही साखर उतारा कमी आहे. डिसेंबर महिन्यामध्ये राज्याच्या सरासरी तापमान हे तापमान २५ तर कधी कधी ३० पर्यंत गेले. यामुळे साखर उतारा कमी राहिला. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यामध्ये १३ ते १५ अंश सेल्सिअस तर विदर्भ, मराठवाड्यात सरासरी १० अंश सेल्सिअस आहे.

नववर्षात थंडीचा कडाका

डिसेंबर महिन्यात थंडीने निराशा केली असली तरी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मात्र थंडीत वाढ होत असल्याचे चित्र आहे. हा अंदाज आणखीन काही दिवस असल्याने याचा फायदा मध्यावर आलेल्या ऊस हंगामाला होईल, अशी शक्यता आहे.

वाढती थंडी साखर उतारा वाढण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मात्र अति थंडी झाली तर उसाच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

- डॉ. अंकुश चोरमुले, ऊस तज्ज्ञ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हिरव्या मिरचीचे दर टिकून; ज्वारीला मागणी कायम, पेरुचा बाजार स्थिर, कारली दर टिकून तर हळदीचे दर स्थिर

Monsoon Rain: मराठवाड्यात २ दिवस पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र, कोकणातही काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

Sangli Rainfall: सांगली जिल्ह्यात पावसाची टक्केवारी घटली

Transformer Issues: बागायती पिकांत सिंचनास वेग, अनेक रोहित्र नादुरुस्त

Crop Insurance: जळगावात कापूस पीकविमा परतावा प्रलंबित

SCROLL FOR NEXT