Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : दमदार पावसाने पेरणी क्षेत्रात वाढ

Kharif Season 2023 : परभणी जिल्ह्यात शुक्रवार (ता.२१) पर्यंत ५ लाख ३४ हजार ८९९ पैकी ४ लाख ४९ हजार ५९३ हेक्टरवर (८४.०५ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५४ पैकी ३ लाख २३ हजार ८२१ हेक्टरवर (८९.६९ टक्के) पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात शुक्रवार (ता.२१) पर्यंत ५ लाख ३४ हजार ८९९ पैकी ४ लाख ४९ हजार ५९३ हेक्टरवर (८४.०५ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५४ पैकी ३ लाख २३ हजार ८२१ हेक्टरवर (८९.६९ टक्के) पेरणी झाली आहे.

गेल्या आठवड्यातील दमदार पावसामुळे पेरणी क्षेत्राचा टक्का वाढला आहे. परंतु सततच्या पावसामुळे अनेक मंडलांतील उर्वरित पेरण्या खोळंबलेल्या आहेत.

परभणी जिल्ह्यात शुक्रवार (ता. २१) पर्यंत सोयाबीनची २ लाख ४९ हजार ७२७ पैकी २ लाख ३७ हजार १८६ हेक्टरवर (९४.९८टक्के), तुरीची २९ हजार ३८५ हेक्टर (६३.९४ टक्के), मुगाची ७ हजार ४४६ हेक्टर (२७.४० टक्के), उडदाची १ हजार ४८१ हेक्टरवर (१६.३१ टक्के) पेरणी झाली.

ज्वारीची १ हजार ९१३ हेक्टर (२६.०९ टक्के), बाजरीची ३९७ हेक्टर (३४.०४ टक्के), मक्याची २४४ हेक्टर (२४.३ टक्के) पेरणी झाली. कपाशीची १ लाख ९२ हजार २१३ पैकी १ लाख ७० हजार ९३७ हेक्टरवर (८८.९३ टक्के) झाली आहे.

एकूण कडधान्यांची ३८ हजार ३३ हेक्टर (४६.५३ टक्के), तृणधान्यांची २ हजार ८७६ हेक्टर, गळितधान्यांची २ लाख ३७ हजार ४४७ हेक्टर, पेरणी झाली.

हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनची २ लाख ५६ हजार ४०४ पैकी २ लाख ४५ हजार २१३ हेक्टर (९५.६४ टक्के) पेरणी झाली. तुरीची ३४ हजार ८९९ हेक्टर (७७.०३ टक्के), मुगाची ४ हजार ३२७ हेक्टर (५५.६१ टक्के), उडदाची ३ हजार ५९२ हेक्टर (६१.१० टक्के), ज्वारीची ३ हजार २१३ हेक्टर (५८.३६ टक्के), बाजरीची ११२ हेक्टर पेरणी झाली.

कपाशीची ३८ हजार ८२१ पैकी ३१ हजार १४१ हेक्टर (८०.२२ टक्के) लागवड झाली. एकूण कडधान्यांची ४३ हजार १७ (७२.९२ टक्के) हेक्टर, तृणधान्यांची ४ हजार १०१ हेक्टर, गळीत धान्यांची २ लाख ४५ हजार ५६२ हेक्टर पेरणी झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT