Kharif Sowing : नगर जिल्ह्यात खरिपाची पेरणी ७३ टक्के

Kharif Season 2023 : कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत खरिपाची पेरणी ७३ टक्के झाली आहे.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon
Published on
Updated on

Nagar News : जिल्ह्यातील अनेक भागांत आतापर्यंत अजूनही पुरेसा पाऊस नाही. खरिपाच्या पेरण्याला उशीर होत आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत खरिपाची पेरणी ७३ टक्के झाली आहे. झालेल्या पेरणीत तूर, सोयाबीनची पेरणी, कापसाची लागवड सरासरीच्या पुढे गेली आहे. बाजरीच्या क्षेत्रात यंदाही कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नगर जिल्ह्यात खरिपाचे ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टर सरासरी आहे. यंदा साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज होता. त्यानुसार कृषी विभागाने बियाणे, खताची मागणी केली आहे. आतापर्यंत खरिपाची ४ लाख १९ हजार ५२० हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ७३ टक्के पेरणी झाली आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : रावेर तालुक्यात ८० टक्के पेरण्या

त्यात सोयाबीनची १ लाख १३ हजार ३०७ हेक्टर म्हणजे १२९ टक्के पेरणी झाली असून, तुरीची ४० हजार ५७७ हेक्टर म्हणजे ११२ टक्के व कापसाची १ लाख २३ हजार १९९ हेक्टर हेक्टरवर म्हणजे १०१.९९ टक्के लागवड झाली आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : राज्यात पेरण्या ७८ टक्क्यांवर

बाजरीचे क्षेत्र कमी होत आहे. आतापर्यंत २९ टक्के म्हणजे केवळ ४५ हजार १७० हेक्टरवर बाजरी पेरली आहे. मुगाची १४ हजार ७३३ हेक्टर म्हणजे ३१ टक्के, तर उडदाची ८१ टक्के पेरणी झाली आहे. तूर, मूग, उडदाचेही क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. भुईमुगाचे क्षेत्र वाढत असून, तेलबियांचेही क्षेत्र अल्प आहे. शेवगाव तालुक्यात सरासरी पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय पेरणीची टक्केवारी

नगर ६१.०२,

पारनेर ५५.७६

श्रीगोंदा १००.०२,

कर्जत ३९.६७

जामखेड ८०.०७

शेवगाव १०९.१९

पाथर्डी ९९.९६

नेवासा ७४.५९

राहुरी ६६.७७

संगमनेर २०.७८

अकोले ५४.९९

कोपरगाव ९४.४८

श्रीरामपूर ७७.४८

राहाता ९३.३६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com