Sugar Factory Agrowon
ताज्या बातम्या

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर ‘प्राप्तिकर’चा छापा

देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील धाराशिव साखर कारखाना लिमिटेड, युनिट-२ संचलित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी (ता. २५) छापा टाकला.

टीम ॲग्रोवन

नाशिक : देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील धाराशिव साखर कारखाना लिमिटेड (Dharashiv Sugar Factory), युनिट-२ संचलित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर (Vasantdada Patil Sugar Factory) प्राप्तिकर विभागाने (Income Tax Raid) गुरुवारी (ता. २५) छापा टाकला. कारखाना स्थापनेपासून पहिल्यांदाच येथे प्राप्तिकर विभागाचा छापा पडल्याने तालुक्यात या कारवाईची चर्चा जोरात होत आहे.

हा कारखाना २०१८-१९ पासून भाडेतत्त्वावर देण्यात आल्याने या कारखान्याला प्राप्तिकर विभागाला तोंड देण्याची वेळ आल्याने सभासदांसह कर्मचारी व कामगार वर्गाचे लक्ष लागून आहे. धाराशिव कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाने २५ वर्षांसाठी ‘वसाका’ कारखाना भाडेतत्त्वावर घेतला आहे. अभिजित पाटील हे समूहाचे अध्यक्ष आहेत.

त्यांनी नुकताच ताब्यात घेतलेल्या साखर कारखाना, कार्यालय व घरावरही गुरुवारी (ता. २५) छापे पडले आहेत. सकाळी सहाच्या सुमारास दोन कारमधून काही अधिकारी ‘वसाका’ कार्यस्थळावर दाखल झाले होते. यावेळी अत्यंत गोपनीयता पाळली गेली. उपस्थित अधिकाऱ्यांनी सुरुवातीला लेखा विभागात चौकशीला सुरुवात केली होती.

शासनाचा कर थकविल्याची चर्चा

धाराशिव संचलित ‘वसाका’ ज्या दिवसापासून चालावयास घेतला तेव्हापासून तर मार्च-२०२२ पर्यंतचा थकीत आयकर, केंद्र व राज्य शासनाच्या विविध खरेदीवरील जीएसटी, अबकारी कर, कारखान्यातील कामगारांचा थकीत भविष्य निर्वाह निधीचा न झालेला भरणा, वेळोवेळी आयकर व भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाकडून आलेल्या नोटिसा याकडे केलेलं दुर्लक्ष त्यामुळे थकलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रकमा भरण्याबाबत केलेली टाळाटाळ या सर्व आर्थिक बाबी तपासल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT