Sugar : सणांमुळे देशांतर्गत बाजारात साखरेला मागणी वाढली

सध्या साखरेचा देशांतर्गत दर ३५०० रुपये क्विंटलवर गेले आहेत. आणखी काही दिवस तरी हा दर कायम राहण्याची शक्यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
Sugar Export
Sugar ExportAgrowon

कोल्हापूर : सणासुदीच्या हंगामाबरोबरच देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात (Domestic Sugar Rate) तेजीचा माहोल गेल्या पंधरा दिवसांपासून कायम आहे. सध्या साखरेचा देशांतर्गत दर (Sugar Rate) ३५०० रुपये क्विंटलवर गेले आहेत. आणखी काही दिवस तरी हा दर कायम राहण्याची शक्यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर साखरेला मागणी वाढल्याचे साखर उद्योगातून (Sugar Industry) सांगण्यात आले.

Sugar Export
Sugar Export : केंद्राची ७.७७ लाख टन साखर निर्यातीस परवानगी

ऑगस्टच्या प्रारंभापासूनच देशांतर्गत बाजारात एमएसपीपेक्षा जादा दर होण्यास सुरुवात झाली. जुलैमध्ये साखरेचे दर ३२०० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल होते. ऑगस्टमध्ये मात्र ३५०० चा टप्पा गाठला आहे. गेल्या वर्षी १०० लाख टनांची निर्यात आणि ३५ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यात आल्याने १३५ लाख टनांचा अतिरिक्त बोजा कमी झाला आहे. सप्टेंबरअखेर साधारणतः २७० लाख टन साखर देशांतर्गत बाजारात विक्री होईल.

Sugar Export
Sugar Export : महाराष्ट्राला यंदाही साखरनिर्यातीची सर्वाधिक संधी

गेल्या वर्षीचा शिल्लक साखर साठा आणि यंदाची उत्पादन व विक्रीची आकडेवारी पाहता यंदाच्या हंगामाच्या प्रारंभी ६० लाख टनांपर्यंत शिल्लक साठा देशात राहू शकतो. किमान तीन महिन्यांची साखर देशात शिल्लक असावी, असा नियम केंद्राचा आहे. सध्याची परिस्थिती पाहता केंद्राच्या नियोजनानुसार ६० लाख टन साखर यंदाच्या हंगामाच्या प्रारंभीला राहू शकते. यामुळे किरकोळ बाजारात साखरेच्या दरात मोठी वाढ होऊन चिंतेची परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता कमी असल्याचे कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले.

देशात कोविडचे सावट असले तरी सार्वजनिक कार्यक्रमांवर त्याचा कोणताच परिणाम झाला नसल्याचे सध्याचे चित्र आहे. केंद्र अथवा राज्याने अजूनही कुठेच निर्बंध अथवा बाजारपेठेवर अंकुश येईल, असे निर्णय घेतले नाहीत. यामुळे दसरा-दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर विविध उद्योगांकडूनही साखरेची चांगली खरेदी होत असल्याचे कारखानदार सूत्रांनी सांगितले. पुढील हंगाम सुरू होईपर्यंत ३४०० ते ३५०० रुपये क्विंटल दर कायम राहण्याची आशा साखर उद्योगाला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com