Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Electricity : विद्युतनिर्मितीत शेतीचे टाकाऊ अवशेष वापरामुळे उत्पन्नाच्या संधी

भारतात २३० दशलक्ष टन बायोमास उत्पादन होते; मात्र वापर न होता जाळून टाकले जाते. त्यांचे मूल्यवर्धन केल्यास मोठी संधी निर्माण होईल. ऊर्जानिर्मिती क्षेत्रात हे क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे.

टीम ॲग्रोवन

नाशिक : पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश या दिल्लीलगतच्या राज्यांत भात व गहू पिकांचे (Paddy & Wheat Crop Nashik) अवशेष मोठ्या प्रमाणावर जाळल्याने वायू प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. भारतात २३० दशलक्ष टन बायोमास उत्पादन (Biomass Production) होते; मात्र वापर न होता जाळून टाकले जाते. त्यांचे मूल्यवर्धन केल्यास मोठी संधी निर्माण होईल.

ऊर्जानिर्मिती क्षेत्रात हे क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर अभियान राबवून पर्यावरण संवर्धन व अर्थकारणाच्या संधी निर्माण होत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाच्या औष्णिक वीज प्रकल्पात बायोमास वापर राष्ट्रीय अभियानाचे संचालक सुदीप नाग यांनी केले.

केंद्र सरकारच्या विद्युत मंत्रालयाची स्वायत्त संस्था राष्ट्रीय विद्युत प्रशिक्षण प्रतिष्ठान, पश्चिम विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. १०) ‘टाकाऊ शेती अवशेष न जाळता त्यापासून पॅलेटनिर्मिती व त्याचा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात वापर’ या विषयावरील एकदिवसीय जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी सुदीप नाग, राष्ट्रीय विद्युत प्रशिक्षण संस्थेच्या प्रमुख संचालक डॉ. मंजू, डॉ. आर. के. मिश्रा दूरदृश्य प्रणालीद्वारे तर सहायक सरव्यवस्थापक महंमद निजामुद्दीन, विषय मार्गदर्शक व समर्थ अभियानाचे सदस्य अभिषेक कुमार यादव, आत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, उपसंचालक वंदना शिंदे, शेतकरी प्रतिनिधी गायधनी व्यासपीठावर उपस्थित होते.

नाग म्हणाले, की शेती अवशेष टाकाऊ घटकांचा पुनर्वापर करताना त्यापासून पॅलेटनिर्मिती केल्यास औष्णिक ऊर्जानिर्मिती क्षेत्रात त्याचा मोठा वापर होईल. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासह ऊर्जानिर्मितीचे ध्येय नव्या माध्यमातून भारत गाठू शकेल. ‘समर्थ’ अभियान कृषी टाकाऊ अवशेष एक उत्पन्नाची संधी म्हणून शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याद्वारे टाकाऊ अवशेष संकलन, पुरवठा व पॅलेट उत्पादन घेऊन विक्री परतावा देण्यासाठी जनजागृती करत असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. मिश्रा म्हणाले, की भारत कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम करीत आहे; मात्र शेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर टाकाऊ घटक शिल्लक राहतात. त्यामुळे शास्त्रीय आणि तांत्रिक उपायांचा अवलंब करून शेती टाकाऊ अवशेषांचे संपत्तीमध्ये रूपांतर करून प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुढे जाण्यासाठी योगदान द्या.

‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रमोद अहिरराव, प्रसाद दहापुत्रे, कांचन खिलारी, योगेश गजरालवार यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय विद्युत प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक व कार्यक्रम संयोजक डॉ. संजय सिंग यांनी सूत्रसंचलन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT