Cow Dung Agrowon
ताज्या बातम्या

Organic Fertilizer : रासायनिकऐवजी शेणखताकडे कल

Dung Fertilizer : वाढलेल्या रासायनिक खतांच्या किमती तसेच वेळेवर न होणारा पुरवठा आदी कारणामुळे शेतकरी शेणखताकडे वळले आहेत.

Team Agrowon

Amravati News : वाढलेल्या रासायनिक खतांच्या किमती तसेच वेळेवर न होणारा पुरवठा आदी कारणामुळे शेतकरी शेणखताकडे वळले आहेत. परिणामी, शेणखताला सध्या सोन्याचा भाव आला असून, पशुपालकांनाही यातून आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे.

पावसाळा लवकरच सुरू होणार असल्याने मशागतीच्या कामाला वेग आला आहे. पावसाळ्यापूर्वी शेतात शेणखत टाकण्यावरही अनेकांनी भर दिला आहे. रासायनिक खतापेक्षा शेणखत टाकण्यावरही अनेकांनी भर दिला आहे. रासायनिक खतापेक्षा शेणखत सरस आहे.

याचा कोणताही दुष्परिणाम पिकावर व जमिनीवर होत नाही. उत्पादनात मोठी वाढ होण्यासह जमिनीची सुपीकता टिकून जमिनीचा पोत सुधारतो. एकदा खत दिल्यानंतर तीन वर्षे त्याचे परिणाम दिसतात. यामुळे मेळघाटातील शेतकरी शेणखत खरेदीसाठी धावपळ करीत आहे.

परिणामी, शेणखत व मेंढीच्या लेंडीखताला सध्या सोन्याचा भाव आला आहे. जनावरांची संख्या कमी झाल्याने शेणखतही कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे उपलब्ध शेणखताच्या खरेदीसाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. शेणखताची एक ट्रॅक्टर ट्राली २५०० ते ३००० रुपयांपर्यंत विकली जात असून, लेंडी खताची एक ट्रॅक्टर ट्रॉली ३००० हजार रुपयांपर्यंत मिळत आहे.

शेणखतामुळे पशुपालकांचे उत्पन्न वाढले

रासायनिक खते ही पिकांसाठी व जमिनीसाठी चांगली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक शेती करावी आता रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी शेणखताकडे वळले आहेत. यामुळे दुग्ध व्यवसायासोबतच पशुपालकांना शेणखत विक्रीचा नवा व्यवसाय मिळाल्याने त्यांचे उत्पन्न वाढले आहे. पशुपालन व शेळीपालन हा व्यवसाय चांगला आहे. रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेणखत व लेंडीखताला मोठी मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT