Sangli News: ‘‘शक्तिपीठ महामार्गासाठी पहिला मोजणीचा प्रयत्न फसला आहे. त्यामुळे पुन्हा मोजणीसाठी नोटिसा दिल्या जात आहे. दुसऱ्यांदा मोजणीसाठी याल तर जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला..बुधवार (ता. मिरज) येथे शुक्रवारी (ता. १५) जिल्ह्यातील ‘शक्तिपीठ’बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी संदीप देसाई, उमेश देशमुख, महेश खराडे, संग्राम पाटील, बजरंग पाटील, बाबूराव शिंदे, प्रभाकर पाटील, शहाजी पाटील, रावसाहेब पाटील, सागर पाटील, अरुण कवठेकर, संतोष आंबी, प्रदीप पाटील शेतकरी उपस्थित होते..Raju Shetti: मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांच्या केवळ वल्गनाच.श्री. शेट्टी म्हणाले, की शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी विरोध केला आहे. परंतु सरकार हा महामार्ग करण्यासाठी पुन्हा मोजणीसाठी शेतकऱ्यांना नोटिसा देत आहे. शेतकऱ्यांनी मोजणीसाठी नकार दिला असताना वारंवार मोजणीचे नाटक कशासाठी सुरू केले आहे. दुबार मोजणीचा प्रयत्न केल्यास सांगलीसह बारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांना टाळे ठोकू. शक्तिपीठ महामार्गाबाबत राज्यातील शेतकऱ्यांचे मजबूत संघटन करण्यासाठी लवकरच बारा जिल्ह्यांत पवनार ते पत्रादेवी अशी यात्रा काढण्यात येईल..Shaktipeeth Highway Protest : शेतात तिरंगा फडकवून ‘शक्तिपीठ’विरोधी नारा.खासदार विशाल पाटील म्हणाले, की निवडणुकीपूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीत निवडून आले. आता पुन्हा ‘शक्तिपीठ’चे भूत बाहेर काढले. अनेक लोकप्रतिनिधी शक्तिपीठच्या विरोधात होते. परंतु आता ते एकत्र आले आहेत. मी एकटाच तुमच्या बाजूने आहे. शक्तिपीठसाठी जबरदस्तीने जमिनी हिसकावाण्याचा प्रयत्न झाल्यास तो आम्ही चालू देणार नाही. महामार्ग करायचाच असेल तर अगोदर राजीनामे द्या, मग शक्तिपीठ करा..आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री बच्चू कडू, आणि किसान सभेचे अजित नवले यांनी मोबाइलवरून मार्गदर्शन केले. उमेश देशमुख, महेश खराडे, प्रवीण पाटील, संदीप देसाई यांची भाषणे झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.