Rain Prediction Agrowon
ताज्या बातम्या

Rain Prediction : ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

या कालावधीत दक्षिण भारतात यंदा ८८ ते ११२ टक्के म्हणजे सरासरी इतक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : मॉन्सूनोत्तर हंगामात (Monsoon seaon) (ऑक्टोबर ते डिसेंबर) दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडतो. या कालावधीत दक्षिण भारतात यंदा ८८ ते ११२ टक्के म्हणजे सरासरी इतक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यातच या कालावधीत महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची (Heavy Rainfall) शक्यता आहे.

देशात मॉन्सून हंगाम (जून ते सप्टेंबर) संपून मॉन्सूनोत्तर हंगामाला प्रारंभ झाला आहे. वायव्य भारताच्या बहुतांश भागातून मॉन्सून परतला आहे. उर्वरित देशात मॉन्सून सक्रिय आहे. मॉन्सून वारे देशातून गेल्यानंतर दक्षिण भारतातील तमिळनाडू,

पदुच्चेरी, कराईकल, आंध्र प्रदेशचा सीमावर्ती भाग, येमेन, रायलसीमा, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक या भागात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होते. हे वारे बंगालच्या उपसागरावरून बाष्प घेऊन येत असल्याने दक्षिण भारतात पाऊस देतात.

दीर्घकालीन सरासरीनुसार मॉन्सूनोत्तर हंगामात दक्षिण भारतात ३३४.१३ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदाच्या हंगामात सरासरी इतक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात संपूर्ण देशाचा विचार करता अति उत्तरेकडील

राज्यांसह वायव्य आणि ईशान्य भारताचा काही भाग वगळता उर्वरित देशात या काळात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या ला-निना स्थिती आहे. मॉन्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टिमनुसार

वर्षअखेरपर्यंत ला-निना स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. तर भारतीय समुद्रामध्ये सध्या निगेटिव्ह आयओडी स्थिती आहे. ती वर्षाअखेर तटस्थ होण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस

ऑक्टोबर महिन्यात देशात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. या काळात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच ११५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दीर्घकालीन सरासरीनुसार ऑक्टोबर महिन्यात देशात ७५.४ मिलिमीटर पाऊस पडतो.

या महिनाभरात महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात सरासरीपेक्षा चांगल्या पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT