Farmer Protest AgrowonAgrowon
ताज्या बातम्या

Farmer Protest : सावकारी कायद्यातील त्रुटी दूर कराव्यात

सावकारग्रस्त शेतकरी समितीचे सोलापुरात उपोषण

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः महाराष्ट्रामध्ये अवैध सावकारीवर (Maharashtra Government) नियंत्रणासाठी २०१४ ला सावकारी विरोधी कायदा अस्तित्वात आणला. परंतु कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पोलिस वा उपनिबंधक यापैकी कोणतीही प्रशासकीय यंत्रणा जबाबदारी घेऊन काम करत नाहीत, या प्रश्‍नात केवळ टोलवा टोलवी होते, याकडे लक्ष वेधण्यासाठी सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collectors office) एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

संघटनेचे अध्यक्ष कांतिलाल नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यामध्ये सचिन कांबळे, दादा चट्टे, दादा आमराळे, सुधीर मोहिते, स्वाती गोसावी, रामेश्‍वर भोसले, माया भोसले यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

अवैध सावकार तारण म्हणून शेतकऱ्यांची जमीन, घर, जागा घेतात. तारण मालमत्तेचा व्यवहार होऊन पाच-पंचवीस वर्षे झालेली असतात. जोपर्यंत शेतकरी सावकाराला व्याज देतो, तोपर्यंत सावकार शांत असतो आणि नैसर्गिक आपत्तीने, अतिवृष्टीने, दुष्काळाने, महाभयंकर आजाराने शेतकरी व्याज देण्यात कमी पडतो,

तेव्हा सावकार जमिनीचा ताबा घेण्यासाठी तगादा लावतो, अशा प्रकरणात जिल्हा उपनिबंधक वा पोलिसांनी हस्तक्षेप करून काही निर्णय घेणे आवश्यक असते, पण असे होत नाही, हे दोघेही जबाबदारी झटकतात, त्यामुळे सावकारीतून आत्महत्यांसारखे प्रकार होतात, असेही यासंबंधीच्या निवेदनात म्हटले आहे. याबाबत गांभीर्याने विचार करून यातील जबाबदाऱ्या निश्‍चित कराव्यात, त्रुटी दूर कराव्यात, असेही त्यात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT