Paisewari Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Paisewari : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत पैसेवारी कमी

खरीप हंगामात पावसाने दाणादाण उडाली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई देण्यात आली असताना अंतिम पैसेवारीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या.

Team Agrowon

अमरावती ः खरीप हंगामात (Kharif Season) पावसाने दाणादाण उडाली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई (Compensation) देण्यात आली असताना अंतिम पैसेवारीकडे (Paisewari) शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या.

त्यानुसार अमरावती विभागातील ७२०८ गावांमध्ये पैसेवारी ४७ जाहीर करण्यात आली. त्यामुळे या गावांतील दुष्काळावर शिक्‍कामोर्तब झाले असून, दुष्काळी सवलती मिळणार आहेत.

अमरावती विभागात अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. संततधार पाऊस, अतिवृष्टी, तसेच पुरामुळे या पाचही जिल्ह्यांत सुमारे दहा लाख हेक्‍टरमधील पिकांचे नुकसान झाले. याकरिता शासनाने वाढीव निकषानुसार मदत जाहीर केली आहे. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना १,५४९ कोटींची मदत आतापर्यंत देण्यात आली आहे.

याशिवाय सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी शासनाने १८० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. अशातच विभागात ५० पैशांच्या आत पैसेवारी जाहीर झाल्याने दुष्काळाच्या सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये जमीन महसुलात सूट, कृषी वीज वसुलीस स्थगिती, विद्यार्थांची परीक्षा फी माफ, रोजगार हमी योजनेची कामे आदींचा समावेश आहे. त्यासाठी मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

...अशी आहे गावांची संख्या

अमरावती जिल्ह्यातील १,९५१ गावांमध्ये ४६, अकोला जिल्ह्यात १९० गावांत, यवतमाळमधील २०४६, वाशीम जिल्ह्यात ७९३ व बुलडाणा जिल्ह्यातील १४२० गावांमध्ये ४७ पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT