Paisewari : अंतिम पैसेवारीतून दुष्काळावर शिक्कामोर्तब

वर्धा जिल्ह्यातील स्थिती, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान
Paisewari
Paisewari Agrowon
Published on
Updated on

वर्धा : जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले. प्रशासनाकडून सर्वेक्षण आणि पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची मदत ही जमा करण्यात आली. अंतिम पैसेवारीतही (Final Paisewari) जिल्ह्याच्या दुष्काळावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Paisewari
Paisewari : अंतिम पैसेवारीकडे शेतकऱ्यांच्या नजरा

गेल्या खरीप हंगामात तीन लाख ३६ हजार ३५१ वर लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी तीन लाख २३ हजार हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. सुरुवातीला मृग नक्षत्रात लागवडीला सुरुवात झाल्यानंतर पावसाने उघडीप दिली.

त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीची वेळ आली. त्यानंतर जून महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस कोसळत होता. संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली.

पुराचे पाणी शेतात शिरून जमीन खरडून जाण्याचे प्रकार घडले. दोन ते तीन महिन्यांतील अतिवृष्टी आणि महापुरामुळे दोन लाख ६० हजार ५१६.९७ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली.

आठही तालुक्यांतील दोन लाख ४५ हजार वीस शेतकरी यामुळे बाधित झाले. या पिकाच्या नुकसानीचे महसूल विभागाने पंचनामे करून त्याचा अहवाल प्रशासनाला सादर केला.

Paisewari
Paisewari : कमी पैसेवारीमुळे सवलतींची अपेक्षा वाढली

यासोबतच केंद्रीय पथकाने ही जिल्ह्याचा दौरा करून या नुकसानीचा धावता आढावा घेतला. त्यानंतर प्रशासनाकडून सुरुवातीला नजर अंदाज पैसेवारी नंतर सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली.

त्यामध्ये १३९ गावातील पैसेवारी ५० पैशांच्या आत निघाली. पण शासकीय मदत मिळण्यासाठी अंतिम पैसेवारी महत्त्वाची ठरते.

ही पैसेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली असून अंतिम पैसेवारी देखील ५० पैशांच्या आत निघाल्याने जिल्ह्यातील दुष्काळाचे वास्तव स्पष्ट झाले आहे. परिणामी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता दुष्काळ सवलतीकडे लागले आहे.

या गावांना पीककर्ज वसुलीला स्थगिती, कर्जाची परतफेड करण्यासाठी मुदतवाढ, नवीन पीककर्ज घेण्यासाठी उपाययोजना, शेतसारा माफ, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ, विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी मोफत बसेस सवलत, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांना प्राधान्य अशा सवलती दिल्या जातात.

४८ गावे वगळली
वर्धा जिल्ह्यामध्ये १३७८ गावे असून, खरिपाची सुधारित आणि अंतिम पैसेवारी जाहीर करताना यातील ४८ गावे प्रकल्पांतर्गत शहरीकरण किंवा अन्य कारणांमुळे वगळण्यात आली. यात वर्धा, देवळी, हिंगणघाट व कारंजा तालुक्यातील प्रत्येकी एक, तर सेलू तालुक्यातील नऊ, समुद्रपूर तालुक्यातील तीन, आर्वी तालुक्यातील १४ आणि आष्टी तालुक्यातील १८ गावांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com