Paisewari : कमी पैसेवारीमुळे सवलतींची अपेक्षा वाढली

अकोला जिल्ह्यात ९९० गावांसाठी पैसेवारी ४७ पैसे
Paisewari
Paisewari Agrowon

अकोला ः सततच्या पावसाने यंदाच्या खरीप (Kharip Season) हंगामात प्रचंड नुकसान केले होते. याचा फटका उत्पादकतेला बसला. त्यामुळेच आता जिल्ह्याची पैसेवारी (Paisewari) ५० च्या आत म्हणजेच ४७ पैसे निघाली आहे. या पैसेवारीमुळे शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध सवलतींचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.

Paisewari
Paisewari : अंतिम पैसेवारीकडे शेतकऱ्यांच्या नजरा

खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबरला महसूल विभाग कृषी विभागाच्या मदतीने दरवर्षी जाहीर करतो. या पैसेवारीचा संबंध थेट दुष्काळासोबत जोडला जातो. सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज पैसेवारी, ऑक्टोबरमध्ये सुधारित नजरअंदाज, तर डिसेंबर अंतिम पैसेवारी जाहीर करण्याची पद्धत आहे. या पैसेवारीवर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवत असते.

Paisewari
Orange Growers : संत्रा निर्यातीसाठी सवलतींची गरज

५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व ५० टक्क्यांवर आल्यास पीक परिस्थिती उत्तम मानली जाते. जिल्ह्यात ९९० गावे खरीप पिकांच्या लागवडीयोग्य आहेत. त्यामुळे यंदा पाहणी करण्यात आलेल्या या गावांमधील अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या पाहणीतून स्पष्ट झाले.

या वर्षात सतत पाऊस झाला. प्रामुख्याने जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत अतिवृष्टीमुळे ९८ हजार ३२१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तसेच १ हजार ७२४ हेक्टर जमीन खरडून गेली. याव्यतिरिक्त सप्टेंबर महिन्यातही पावसाने ३६ हजार २७२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान केले होते. ऑक्टोबर महिन्यातही परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत ८ हजार १२४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान केले. या सर्व बाबींचा उत्पादनावर परिणाम झाला. सोयाबीनचे उत्पादन सरासरी ३ ते ५ क्विंटल, कपाशीचे चार ते पाच क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. तुरीचे पीक बुरशीने बहुतांश ठिकाणी उद्ध्वस्त केले. मूग, उडदाच्या पिकांनी, तर उत्पादनाचा खर्चही काढून दिला नाही. अशी बिकट परिस्थिती यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांना झेलावी लागली आहे.

तालुकानिहाय पैसेवारी

तालुका गावे पैसेवारी

अकोला १८१ ४६

अकोट १८५ ४८

तेल्हारा १०६ ४७

बाळापूर १०३ ४७

पातूर ९४ ४९

मूर्तिजापूर १६४ ४६

बार्शीटाकळी १५७ ४८

एकूण ९९० ४७

या मिळू शकतात सवलती

जमीन महसुलात सूट

सहकारी कर्जाचे पुनर्गठन

शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती

कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट

रोहयोअंतर्गत कामांच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता

टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे

विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कास माफी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com