Agriculture Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियात शेतीला मिळणार दिवसा वीज

वनक्षेत्रात रात्री शेतीला पाणी देताना वन्य प्राण्यांचे होणारे हल्ले होत असल्याने चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांतील वनक्षेत्रात दिवसा वीज देण्यात येणार आहे.

टीम ॲग्रोवन

मुंबई : वनक्षेत्रात रात्री शेतीला पाणी (Agriculture Electricity) देताना वन्य प्राण्यांचे होणारे हल्ले होत असल्याने चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांतील वनक्षेत्रात दिवसा वीज (Daytime Electricity For Agriculture ) देण्यात येणार आहे. या बाबतची मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. त्यास ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.

शेतीसाठी करण्यात येणारे भारनियमन रद्द करून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळात कृषिपंपांना सलग वीजपुरवठा करण्‍यात येईल, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली आहे. या संदर्भात राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चा केली. उपमुख्‍यमंत्री फडणवीस यांनी यासंबंधी तत्काळ सकारात्‍मक कार्यवाहीचे निर्देश ऊर्जा विभागाला दिले आहेत.

या जिल्ह्यांमध्ये दुपारच्‍या वेळी कृषिपंपांसाठी भारनियमन करण्‍यात येत असल्‍यामुळे रात्रीच्‍या वेळी शेतकरी संबंधित कामांसाठी शेतात जातात. अशा वेळी वन्‍यप्राण्‍यांच्‍या होणाऱ्या हल्‍ल्‍यात शेतकऱ्यांचे बळी जाण्‍याचा घटना जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यामुळे सध्या रात्रीच्या वेळी शेतीची कामे करण्यास शेतकरी वर्ग धास्तावलेला आहे. या बाबत शेतकऱ्यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांना भेटून दिवसा वीज देण्याची विनंती केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT