Electric Pump
Electric Pump Agrowon

Electric Pump : विद्युतपंप चोरट्यांचा ताहाराबादमध्ये सुळसुळाट

शेतकऱ्याचा संताप; जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Published on

ताहाराबाद, ता. सटाणा : ताहाराबाद येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीवरील विद्युतपंपासह साहित्य चोरट्यांनी लंपास (Looted By Thives) केले. या घटनेमुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात (Jaykheda Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Electric Pump
Solar Pump : यंदा २ लाख सौरपंप वितरित करण्याचे नियोजन

सटाणा तालुक्यातील ताहाराबाद येथील शेतकरी जयवंत सोमनाथ साळवे यांची अंतापूर रोडला रावेर शिवारात शेतजमीन आहे. या शेतामधील विहिरीवर बसविलेला १२ हजार रुपये किमतीचा ३ अश्‍वशक्तीचा (एचपी) विद्युतपंप, ३ हजारांचे स्टार्टर, शेतीसाठी लागणारी अवजारे ठेवण्याच्या खोलीचे दार तोडून अंदाजे वीस हजार रुपये किमतीचे डिझेल इंजिन चोरट्यांनी लंपास केले.

पंप, स्टार्टर, डिझेल इंजिन चोरी झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने वस्तूचा शोध घेतला. परंतु, यश आले नाही. त्यानंतर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. जायखेडा पोलिस तपास करीत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी याच मळ्यातून १ एचपीचा विद्युतपंप व त्याची केबल, घरातील एका ५ एचपीच्या पंपाची आतील कॉईल, स्टार्टर व पंपाची बॅटरी चोरी झाली. दिवाळीनंतर कांदा विक्रीतून पुरेसे पैसे आल्यावर सुरक्षेच्या उपाययोजनेचे नियोजन होते. परंतु, त्याआधीच चोरी झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com