Money Lending Agrowon
ताज्या बातम्या

Illegal Money Lending : गडचिरोलीत बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी

गडचिरोली येथील सुयोग नगर (नवेगाव) येथे महिला बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करणाऱ्या मोनिका खनके व संगीता निंबाळकर यांच्या घरांवर सहकार विभाग व पोलिस विभागाने संयुक्तरीत्या धाड टाकली.

Team Agrowon

Illegal Money Lending गडचिरोली : गडचिरोली येथील सुयोग नगर (नवेगाव) येथे महिला बचत गटाच्या (Women Self Help Group) नावाखाली अवैध सावकारी करणाऱ्या मोनिका खनके व संगीता निंबाळकर यांच्या घरांवर सहकार विभाग (Cooperative Department) व पोलिस विभागाने संयुक्तरीत्या धाड टाकली.

यात नियमबाह्यरीत्या चालणाऱ्या सावकारी (Illegal Money Lending) व्यवहाराची कागदपत्रे आढळून आली. ती कागदपत्रे जप्त करून त्यांच्या विरुद्ध सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत कारवाई केली जात असल्याचे सहकार विभागाच्या वतीने कळविण्यात आले.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था निबंधक प्रशांत धोटे यांच्या आदेशान्वये प्राप्त तक्रारीनुसार मोनिका खनके व संगीता निंबाळकर या महिला बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करीत असल्याची माहिती मिळाल्याने सहायक निबंधक विक्रमादित्य सहारे यांनी खनके यांच्या घरी व पंकज घोडे (ता. चामोर्शी) यांनी संगीता निबांळकर यांचे घरी एकाच वेळी धाड टाकली.

या मोहिमेत खनके यांच्या घरी १२ स्टॅम्प पेपर, १२ स्टॅम्प पेपरच्या छायांकित प्रति, ७ कोरे धनादेश, १ धनादेश बुक, २ साध्या पेपरवर केलेला करारनामा, रकमेच्या नोंदी असलेल्या २१ चिठ्ठ्या, ३ रजिस्टरची पाने व १० हिशेबाच्या नोंदवह्या, ६ बॅंक पासबुक, अनेक व्यक्तींची मतदान ओळखपत्रे, पॅन कार्ड, आधार कार्ड, इलेक्ट्रिक बिलांच्या २४ छायांकित प्रति, विक्री पत्र, मालमत्तापत्र (सेलडिड), तसेच आनुषंगिक ३९ कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली.

याशिवाय संगीता निंबाळकर यांच्या घरी ६ स्टॅम्प पेपर, २ डायऱ्या, १२ कोरे धनादेश, ३ सातबारा नमुने, ५ सेलडिड नमुने, २१ चिठ्या, ६, विक्रीपत्र, ५ मालमत्तापत्र (सेलडिड) इत्यादी कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली. चौकशीनंतर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सहारे यांनी सांगितले.

सावकारीबाबत काही तक्रार असल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरेाली तसेच तालुका सहायक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयात तक्रारदारांनी तक्रार द्यावी, असे आवाहन धोटे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change: हवामान बदलते, शेतीत बदल कधी?

Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात

Sugar Factory Seizure: एफआरपी थकवणाऱ्या सात साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

Farm Loan Waiver: प्रलंबित कर्जमाफीला हिरवा कंदील; १४०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT