Sushilkumar shinde Agrowon
ताज्या बातम्या

Sushilkumar Shinde :कारस्थान करुन मला मुख्यंमत्रीपदावरुन काढलं-सुशीलकुमार शिंदे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याच स्वपक्षीय नेत्यांवर नाव न घेता थेट बाण रोखला.

टीम ॲग्रोवन

सोलापूर : काँग्रेस पक्षातील (Congress Party) लोकांनी कट कारस्थान करून त्या वेळी मला मुख्यमंत्रिपदावरून काढले आणि राज्यपाल म्हणून आंध्र प्रदेशला पाठविले, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी आपल्याच स्वपक्षीय नेत्यांवर नाव न घेता थेट बाण रोखला.

महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळातर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सोलापुरात रविवारी (ता. १९) भारत गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या सत्काराला उत्तर देताना शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना झालेली निवडणूक आणि ती जिंकूनही पदावरून हटविल्याची खंत व्यक्त केली.

श्री. शिंदे म्हणाले, की मुख्यमंत्री असताना मी गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण दिले होते. तेवढे एक चांगले काम मी गुजराती समाजासाठी केले होते. लोक आता विसरून गेले की सुशीलकुमारांनी ते चांगले काम केले. त्यानंतर एका गुजराती साधूंनी मला बोलावून घेऊन आशीर्वाद दिला होता.

मुख्यमंत्री असताना मी हे सगळे केल्यामुळेच मी महाराष्ट्रात परत निवडणुका जिंकून आलो होतो. त्या वेळी निवडणुका जिंकणे साधी गोष्ट नव्हती; मात्र, (व्यासपीठाकडे बोट दाखवत) यांना माहिती आहे, आतले कारस्थान. कसे मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरून काढले आणि राज्यपाल म्हणून आंध्र प्रदेशला पाठविले. पण ठीक आहे.

मी त्यानंतर दिल्लीच्या मंत्रिमंडळात गेलो. ज्या लोकांनी मला आंध्रला पाठवले. ‘त्यांना’ जो पराभव पत्करावा लागला, तो अजूनपर्यंत आहे. असे होते. पण आपण आपले काम प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yeramala Yatra: येडेश्वरी देवीच्या जयघोषाने दुमदुमली येरमाळानगरी

Satara Agriculture Loss: सातारा जिल्ह्यात गारपीट,वादळी वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान

Hapus Mango Prices: आवक वाढताच हापूसचे दर गडगडले

Electoral Roll Revision: कळंब तालुक्यात मतदार याद्यांचे पुनरीक्षण वेगात

Pre Monsoon Rain: नेवासा, पाथर्डी तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT