Onion Seed Rate
Onion Seed Rate Agrowon
ताज्या बातम्या

Onion Seed Rate : बियाण्याच्या चढ्या दरांचा फटका

टीम ॲग्रोवन

जळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामात लागवडीच्या (OnionCultivation) कांद्याच्या रोपवाटिका (Onion Seedling Nursery) तयार करण्यास पुढील १० ते १२ दिवसात सुरवात होईल. पुढेही लागवड स्थिर किंवा कमी राहील. त्यातच बियाण्याचे दर (Onion Seed Rate) चढे असल्याने वित्तीय फटकादेखील शेतकऱ्यांना बसणार आहे.

यंदा सुमारे १० ते १२ हजार हेक्टरवर खानदेशात उन्हाळ किंवा रब्बीमधील कांदा लागवड होईल. डिसेंबरमध्ये लागवड सुरू होईल. त्यासंबंधी रोपवाटिकांचे नियोजन शेतकरी करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी आगाप हंगामासाठी आपल्या रोपवाटिकांमध्ये बियाणे टाकून त्यात सिंचनही केले आहे. या रोपवाटिकांमधून सव्वा महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातच रोपे लागवडीसाठी उपलब्ध होतील. या कांद्याला चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव, एरंडोल, जळगाव, भुसावळात, धुळ्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा, नंदुरमधील नंदुरबार, तळोदा तालुक्यात कांद्याची लागवड बऱ्यापैकी होईल. यंदा जलसाठे मुबलक आहेत. यामुळे अनेक शेतकरी लागवडीचे नियोजन करीत आहेत. कांदा रोपवाटिकांसाटी अनेक शेतकरी बाजारातून व ओळखीपाळळखीच्या मंडळींकडून कांदा बियाणे खरेदी करीत आहेत. या बियाण्याचे दर १०००, १२००, १५००, २२०० रुपये प्रतिकिलो, या दरात उपलब्ध आहे.

काही कंपन्यांचे बियाणे अधिक महाग आहे. त्यामुळे कमी दराच्या किंवा शेतकऱ्यांकडील बियाण्याची खरेदी करण्याचे नियोजन शेतकरी करीत आहेत. कारण बियाण्यावरील खर्च वाढल्यास उत्पादन खर्च अधिक होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यातच दर कमी आहेत. यामुळे कांदा लागवड पुढेही वाढणार नाही, असे दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात पाच ते सहा हजार हेक्टरवर कांदा लागवड होईल, अशी अपेक्षा आहे. अनेक शेतकरी ठिबकवर लागवडीचे नियोजन करीत आहेत. यामुळे चांगले किंवा अधिकचे उत्पादन येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

शेतकऱ्यांची दर कमी करण्याची मागणी

पण बियाणे दर कमी केले पाहिजेत. कारण खरेदीदार किंवा पुरवठादार कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून १८०, २०० ते ३०० रुपये प्रतिकिलो या दरात बियाणे खरेदी केले आहे. त्यावर अधिकचा नफा पुरवठादार कसे घेवू शकतात. बाजारात बियाण्याला मे, जूनमध्ये जे दर होते, त्यानुसार बियाण्याचे दर पुढे असावेत, असाही मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहे. अव्वाच्या सव्वा दरात बियाणे विक्री करण्याचा शोधही घेतला पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT