Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Odisha Rain : ओडिशात जोरदार पावसाची हजेरी

Heavy Rainfall in Odisha : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाल्याने ओडिशात जोरदार पावसाने हजेरी लावली.

Team Agrowon

Red Alert in Odisha : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाल्याने ओडिशात जोरदार पावसाने हजेरी लावली. राजधानी भुवनेश्वरमध्ये ऑगस्ट महिन्यातील एका दिवसातील पावसाचा यापूर्वीचा विक्रम मोडला गेला. बुधवार (ता. २) दुपारपर्यंत समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

हवामान खात्याच्या निवेदनात म्हटले आहे, की बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र प्रतितास २५ किमी वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकले आहे. तीव्रता वाढून त्याचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. सध्या हे क्षेत्र बांगलादेशातील खेपुपाराच्या पूर्वेस सुमारे १६० किमी आणि प. बंगालमधील दिघाच्या पूर्वेस ४२० किमी अंतरावर आहे.

त्याची तीव्रता वाढून ते आज संध्याकाळपर्यंत खेपुपाराचा किनारा ओलांडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली. त्यापुढील २४ तासांत ते प.बंगालमध्ये पश्चिम-वायव्येकडे सरकण्याचीही शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे समुद्र खवळलेला राहणार असल्याची शक्यता आहे.

प. बंगाल व बांगलादेश किनाऱ्यानजीक वाऱ्याचा वेग प्रतितास ५५ कि.मी. राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला अनुकूल हवामान असल्याने ओडिशात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली.

आज सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत राजधानी भुवनेश्वरमध्ये २५९ मिमी पावसाची नोंद झाली. हा भुवनेश्वरमध्ये ऑगस्टमध्ये पडलेला विक्रमी पाऊस असून यापूर्वी २० ऑगस्ट १९९७ रोजी २५४ मिमी पाऊस पडला होता.

चार जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

हवामान खात्याने भुवनेश्वरमधील चार जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्याचप्रमाणे, इतर १३ जिल्ह्यांना ‘ऑरेंज' तर १० जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. अतिवृष्टीच्या शक्यतेने प्रशासन आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Bill : बियाणे विधेयकाच्या मसुद्यावर पुन्हा चर्चा; केंद्र सरकारला १८ हजार सूचना

Manoj Jarange Patil: आंदोलन करताना बहिणीने भावाला जेवायला बोलवू नये : मनोज जरांगे पाटील

Baglan Drought : बागलाण तालुक्यात दुष्काळ जाहीर करा; हेक्टरी लाखाची मदत द्या

Drought Management: दुष्काळाबाबत प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी

Sugarcane Crushing Season: गाळपाची घाई, तोट्यात नेई

SCROLL FOR NEXT