Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : पूर्व विदर्भात पावसाचा जोर

Latest Rain Update : राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे. तर कोकणात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात तुरळक सरी बरसत आहेत.

Team Agrowon

Pune News : राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे. तर कोकणात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात तुरळक सरी बरसत आहेत. तसेच अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. पूर्व विदर्भातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये पूर्व विदर्भातील शंकरपूर मंडळात १४४.३ मिलिमीटर पावसाची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून पावसाने काही प्रमाणात उघडीप देण्यास सुरुवात केली आहे. कोकण, घाटमाथ्यावर कमीअधिक पाऊस पडत असला तरी दोन दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. कोकणातील कडवाई मंडळात ४९, अंगवली ५४.३, सौंदळ ४६.३, पाचल ४६.३, पेंडूर ४३.५, अंबोली ५४.८, मदुरा ४०.८, कणकवली ४५.५, फोडा ५१, तलवात ५४.८, बेडशी ५२ मिलिमीटर पाऊस पडला.

अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील खानदेशात पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. तर नाशिक, नगर, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम पट्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर पूर्व भागात अधूनमधून तुरळक सरी कोसळत असून अनेक भागात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे.

तुरळक पावसामुळे पेरण्यांना दिलासा मिळत असला तरी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालेला नाही. सालवन येथे ७२.८ मिलिमीटर, तर इगतपुरी ५२.५, भोलावडे ५३.८, हेलवाक ५६.०, मोरगिरी ५६, महाबळेश्वर ५९.८, राधानगरी ५३.३ मिलिमीटर पाऊस पडला.

मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असून अनेक भागात अंशतः ढगाळ वातावरण आहे. तर भोकरदन येथे २३.८, बिलोली २०, लोहगाव २७.३ मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या आठवड्यात झालेल्या हलक्या ते मध्यम पावसाने पिकांना दिलासा मिळाला असला तरी अनेक ठिकाणी शेतीकामांना चांगलाच वेग आला आहे.

विदर्भात पावसाचा जोर कमीअधिक आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा भागात पावसाचा जोर कमी असून काही ठिकाणी पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली आहे. तर लाखांदूर १०७.३, भिवापूर १०५.८, आमगाव १०५, सावर्ला १००.८, आरमोरी १०५.५, काढोळी १०८.३ येथे १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

घाटमाथ्यावर पडलेला पाऊस, (मिलिमीटरमध्ये) :

कोयना १२४, शिरगाव ११२, दावडी ८१, डुंगरवाडी ६५, कोयना (पोपळी) ६०, अंबोणे ५९, ताम्हिणी ५०, वळवण ४१, लोणावळा ३९, शिरोटा ४७, खोपोली ३९, खांड ३३, भिरा ३९, कुंडली ५२.

रविवारी (ता.९) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात मंडलनिहाय झालेला पाऊस : (स्रोत - कृषी विभाग)

मध्य महाराष्ट्र : धारगाव ४२.५, प्रतापपूर ४५, बोरड ३१.८, तळोदा ३३, साकीरवाडी ३१, माले ३३.३, मुठे ३३.३, कार्ला ३५, लोणावळा ३५.३, दहीवड ४३.८, परली ४२.८, लामज ४७.३, चरण ४८.०, करंजफेन ३८.३, अंबा ३८.५, कसबा तरले ३५, गगनबावडा ४१.८, सांगरूळ ३०.८,

विदर्भ ः ब्राम्हणवाडा ५१, धामणगाव ६४.८, चिंचोली ६१, मंगरूळ ६२.३, रोहाना ६८.५, हिंगोली ५१.०, सिंधी ५७.५, पुलगाव ५८.८, सावळी वाघ ६७.५, निंदोरी, कोरा ६७.५, बोरी ८७.३, वाडी ७२.३, सोनगाव ६६.३, आडेगाव ६९.५, गुमगाव ६०, ताकलघाट ७५, नागरधान ५१, आमदी ७२.५, कोडमेढी ७४, कमलेश्वर ५३.५, धापेवाडा ५३.५, माकरधोकडा ७६.८, बेला ६६.८, हेवंती ७६.८, पाचेगाव ६७.५, माळेवाडा ८४.३, कारगाव ९१.५, कुही ७६.५, मांढल ८७.३, पाचखेडी ८७.३, राजोळी ७०, शहापूर ९२.३, भंडारा ७८.५, धारगाव ७६, बेला ७८.३, खोकार्ला ७८.३, मोहाडी ५५, वरथी ९१.५, कार्डी ८६, केंद्री, कन्हळगाव, आढळगाव ६०.८, आडयाल ८०.३, साकोळी ५५, चिंचल ५८.५,कोढा ५६, सांगडी ७६.३, बारवा ८१.५, बागडी ८६.८, पोहरा ५०.३, मुरमडी ८२.३, गंगाझरी ६८, रतनारा ६५, धसगाव ६५, रावणवाडी ७२.५, तिगाव ६१.३, तिरोडा ६०.८, वाडेगाव, थानेगाव ६०.८, कवरबांढ ६९.३, देवरी ६०, सिंदीबिरी ८६.८, सौदड ५४.५, सडकअर्जुनी ५१.३, कुंबाडा ५९.३, बिसी १०८, नेरी ७५.५, गांभूळघाट ६१.३, मासल ६८.५, ब्रम्हपुरी ९२.३, अनहेर नावरगाव ९२.३, गंगाळवाडी ९०.३, चौगुण ९२.३, मेंडकी ९४.८, नागभिड ९६.५, मेढा ७६.८, मिढाळा ९१.३, नावरगाव ८१, कुरखेडा ८८, माळेवाडा ८६.५, पिसेवाददा ६५, वैरागड ६४.५, देसाईगंज ९८.५, शंकरपूर ८६.५,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT