Heavy Rainfall Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rainfall : लातूरमधील एका मंडलात अतिवृष्टी

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाचही जिल्ह्यांत कमीअधिक प्रमाणात परतीच्या पावसाचे धुमशान कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहे.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाचही जिल्ह्यांत कमीअधिक प्रमाणात परतीच्या पावसाचे धुमशान कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहे. गुरुवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत लातूर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहिला. तर गुरुवारी सकाळपासून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. या पावसामुळे नुकसानीच्या (Crop Damage) क्षेत्रात वाढ होण्याची चिन्ह आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ४० मंडलांत गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील वाळूज मंडलात नोंदल्या गेलेला ६४ मिलिमीटर पाऊस सर्वाधिक राहिला. बहुतांश मंडलातील पावसाची हजेरी तुरळक हलकीच होती.

जालना जिल्ह्यातील ४९ पैकी २९ मंडलांत तुरळक हलका पाऊस झाला जिल्ह्यातील परतूर मंडलात झालेला ३४.८ मिलिमीटर पाऊस सर्वाधिक राहिला. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ३१ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला. धारूर तालुक्यातील धारूर मंडलात झालेला २९.८ मिलिमीटर पाऊस सर्वाधिक राहिला.

लातूर जिल्ह्यातील सर्व साठ मंडलांत पावसाची तुरळक, हलकी, मध्यम ते दमदार हजेरी लागली. जिल्ह्यातील बाभळगाव मंडलात सर्वाधिक ६५.८ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीचा नोंद झाली. लातूर मंडलात २३.८, हरंगुळ २३.८, पानचिंचोली २५.३, कासारबालकुंदा ४४.८, वलांडी ४५, साकोळ ४५, हिसामाबाद २८.३ मिलिमीटर झालेला पाऊस दखलपात्र राहिला. इतर मंडलांत पावसाची हजेरी तुरळक, हलक्या स्वरूपाचीच होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील २५ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला.

नुकसानीची प्राथमिक माहिती मागवली...

जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीनंतर पुन्हा एकदा अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे नुकसान होते आहे. या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे होणाऱ्या नुकसानीची विभागीय स्तरावरून प्रत्येक जिल्ह्याला प्राथमिक माहिती मागविण्यात आल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा बाजारात चढ-उतार, हळदीच्या दरात किंचित वाढ, वांग्याच्या भावात बदल, पालकच्या दरात सुधारणा तर लिंबाच्या आवकेत बदल

Rabi Season: रब्बीतील कृषी योजनांसाठी ‘महाडीबीटी’वर अर्ज सुरू

Dams Water Supply: चाळीसगाव, भडगावसह सहा गावांची टंचाई दूर

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा अंदाज; कोणत्या भागात जोर?

Sangamner Farmer Protest: '१९७२ पेक्षा मोठा दुष्काळ, पाणी उचलण्यासाठी वीज नाही'; शेतकरी आक्रमक, संगमनेरमध्ये धडकला जनआक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT