Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : येवला तालुक्यातील ५ महसूल मंडलांत अतिवृष्टी

Latest Rain Update : जुलै महिन्याच्या अखेरपासून जिल्ह्याच्या अनेक भागांत पाऊस झालेला नाही. त्यामध्ये सिन्नरसारख्या तालुक्यात जवळपास ४० गावांमध्ये खरिपाचा पेरा नाही.

Team Agrowon

Nashik News : जुलै महिन्याच्या अखेरपासून जिल्ह्याच्या अनेक भागांत पाऊस झालेला नाही. त्यामध्ये सिन्नरसारख्या तालुक्यात जवळपास ४० गावांमध्ये खरिपाचा पेरा नाही. तर जुलैमधील पावसाच्या ओलीवर झालेल्या पेरण्या फक्त नावापुरत्या शेतात उभ्या होत्या. अशा परिस्थितीत खरीप पूर्णपणे हातातून गेला. तर आता पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

अशा परिस्थितीत सप्टेंबर महिन्यात पावसाने पुन्हा हजेरी लागल्याने शेतकरी काहीसा सुखावला. शुक्रवारी (ता. २२) सकाळी ८ वाजेपर्यंत येवला तालुक्यात ६९.५ मिमी पावसाची नोंद झाली. पण दुपारनंतर तालुक्यात पाउस सुरु होता. तर अंदरसुल महसूल मंडलात १४० मिमी इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात येवला, नांदगाव, निफाड, चांदवड, मालेगाव, सटाणा, कळवण, देवळा या तालुक्यांमध्ये खरिपाच्या पेरा झाला; मात्र ही पिके उभी करपून गेली.

त्यामुळे खरीप वाया गेला, मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाल्याची परिस्थिती होती. अशातच मागील सप्ताहात जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात झालेल्या पावसामुळे समाधानकारक वातावरण तयार झाले.

पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली होती. मात्र पूर्व भागातील तालुक्यात पावसाची प्रतीक्षा लागून होती. त्यातच येवला तालुक्यात ५ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

पावसाने दडी दिल्याने अक्षरशः जमिनीला भेगा पडल्या होत्या, तर पिके अक्षरशः करपून गेल्याची गंभीर स्थिती होती. आता या पावसाने पिकांना फायदा होणार नाही. मात्र जनावरांचा चाऱ्याचा व पिण्याचा प्रश्‍न सुटेल अशी भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

नाशिक, दिंडोरी, मालेगाव, सटाणा, कळवण, नांदगाव, निफाड, सिन्नर, चांदवड, त्र्यंबकेश्‍वर व देवळा तालुक्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला. सुरगाणा तालुक्यांतील सुरगाणा व उंबरठाणा, तर इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी व धारगाव महसूल मंडलांत पावसाचा जोर दिसून आला.

येवला तालुक्यातील

या मंडलात अतिवृष्टी

मंडळ पाऊस(मिमी)

येवला ७७.८

नगरसुल ७५.८

अंदरसुल १४०.५

सावरगाव ६५.८

अंगणगाव १०६.८

तडी मारल्याने पिके फक्त नावापुरती उरलेली होती मात्र जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला होता. दूध व्यवसायाला दुष्काळसदृश परिस्थितीमुळे घरघर लागली होती. मात्र अशा परिस्थितीत पावसाने हजेरी लावल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. जनावरांचा चारा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. मात्र हा पावसामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र सोयाबीन, मका ही पिके हातातून गेली आहेत.
- मकरंद सोनवणे, माजी सभापती, अंदरसुल उपबाजार आवार, ता. येवला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT