Nashik Rain Agrowon
ताज्या बातम्या

Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात ४४ मंडलांत अतिवृष्टी

Nashik Rain Update : जुलैअखेर गायब झालेल्या वरुणराजाने गुरुवारी (ता.७) रात्रीपासून कृपादृष्टी केली असून, शुक्रवारी (ता. ८) पहाटेपासून मुसळधार हजेरी लावली आहे.

Team Agrowon

Nashik Weather News : जुलैअखेर गायब झालेल्या वरुणराजाने गुरुवारी (ता.७) रात्रीपासून कृपादृष्टी केली असून, शुक्रवारी (ता. ८) पहाटेपासून मुसळधार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला आहे.

खरिपातील काही पिके यामुळे वाचली असून, धरणातील साठ्यांतही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यातील १०६ महसूल मंडलांपैकी ४४ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी नदीला पहिला पूर आला असून, दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. याशिवाय गिरणा, कादवा, कोलवण, आरम, मोसम, उनंदा, वालदेवी नदीला पूर आला आहे.

कोलवणच्या दोन्ही काठच्या रहिवाशांना खबरदारीची सूचना देण्यात आली होती. सुरगाणा, दिंडोरी, कळवण, सटाणा, त्र्यंबकेश्र्वर, पेठ, इगतपुरी, नाशिक तालुक्यांत पावसाचा जोर दिसून आला.

जिल्ह्यात गुरुवारी (ता. ७) पासून पावसाचे पुनरागमन झाले. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे श्रावण महिन्यात गोदावरी प्रथमच दुथडी भरून वाहिली.

मात्र या काळात पावसाळ्यात कोरडीठाक पडलेल्या गोदावरीची अवस्था पाहून अनेकांच्या ९ सप्टेंबर १९६९ च्या पहिल्या महापुराच्या म्हणजे ५४ वर्षांपूर्वीच्या स्मृती जागृत झाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertiliser Subsidy: आर्थिक संकटाची चाहूल?; खत अनुदानाचा भार ७० हजार कोटींनी वाढणार, देशात किती खत साठा शिल्लक?

Pusad APMC: बाजार समितीच्या काट्यावरच शेतकऱ्यांची ‘काटछाट’

Low Fertilizer Farming: कमी खतांमध्ये चांगले उत्पादन कसे घेता येते?

Kharif Crop Planning: पुसद तालुक्यात ७५ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Watermelon Sales Decline: टरबूज विक्रीवर मुंबईतील घटनेचे सावट

SCROLL FOR NEXT