Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला

Maharashtra Rain : कोकण, पश्‍चिम विदर्भ, मराठवाड्यासह नाशिक जिल्ह्यात मुसळधार
Rain Update
Rain UpdateAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Rain : पुणे : राज्यातील कोकण, पश्‍चिम विदर्भासह नाशिक जिल्ह्यात शनिवारी (ता. ९) जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालन्यात जोर अधिक राहिला. तर इतर जिल्ह्यांत हलका पाऊस झाला. खानदेशसह सातारा, कोल्हापूरचा पश्‍चिम भाग, यवतमाळ जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. उर्वरित राज्यात अपवाद वगळता ढगाळ हवामान राहिले. या पावसामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. नगर, सोलापूर, सांगलीसह राज्याच्या अनेक भागांत अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

शुक्रवारपासून (ता. ८) जोरदार पाऊस पडत असल्यामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, पावसाअभावी संकटात सापडलेल्या पिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांतील बहुतांश तालुक्यात पाऊस सुरू आहे. शनिवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार बुलडाण्यातील मलकापूर तालुक्यात सरासरी ७५ मिलिमीटर पाऊस झाला. तालुकाभर अतिवृष्टी झाली आहे. धरणगाव मंडलात विक्रमी ९८ मिलिमीटर पाऊस झाला. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत सलग तिसऱ्या दिवशी ८२ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. गेल्या २४ तासांत परभणी जिल्ह्यात सरासरी ११ मिलिमीटर, तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी २०.१ मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या तीन दिवसांतील पावसामुळे खरीप पिकांना तरारी आली आहे. नागपूर विभागात बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहिले. यवतमाळ जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ८) रात्रीपासून पावसाने हजेरी लावली.

Rain Update
Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासी पश्‍चिम भाग सोडला, तर अजूनही जिल्ह्यात जोरदार पाऊस नाही. दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. अधून-मधून पावसाची संततधार पडत आहे. सांगली जिल्ह्यात कधी ढगाळ तर कधी ऊन होते. सोलापुरात कधी ऊन, कधी ढगाळ वातावरण होते. कोल्हापूर जिल्ह्यात पश्‍चिम भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पूर्वेकडे ढगाळ हवामान होते. जळगाव, धुळे जिल्ह्यात शुक्रवारी रात्रभर भीज पाऊस झाला. शनिवारी (ता. ९) सकाळीदेखील चांगला पाऊस पडला. गिरणा धरणाचा साठा ३६ टक्क्यांवरून शनिवारी (ता. ९) सकाळी सहा वाजता ४४ टक्के एवढा झाला. सातारा महाबळेश्‍वर, पाटण, जावळी तालुक्यांत अनेक ठिकाणी मध्यम पाऊस झाला. जिल्ह्याच्या इतर भागांत तुरळक ते हलका पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरिपाच्या काही प्रमाणात का होईना आशा पल्लवित झाल्या आहेत.
दोन दिवसांपासून मराठवाड्यातील बहुतांश भागात असलेला पावसाचा जोर शनिवारी सकाळी ८ पर्यंतच्या चोवीस तासांत अधिक राहिला. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला. या दोन जिल्ह्यातील जवळपास १४ मंडलांत अतिवृष्टी झाली. दुसरीकडे बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात पावसाची हजेरी तुरळक, हलकीच राहिली.

Rain Update
Rain Update : घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर वाढला

गोदावरीला पूर
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ८) पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाने शेतकऱ्याच्या जिवात जीव आला आहे. धरणातील साठ्यांतही वाढ होत आहे. जिल्ह्यातील १०६ महसूल मंडलांपैकी ४४ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यंदा गोदावरी नदीला पहिला पूर आला आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. याशिवाय गिरणा, कादवा, कोलवण, आरम, मोसम, उनंदा, वालदेवी नदीला पूर आला आहे. कोलवणच्या दोन्ही काठांच्या रहिवाशांना खबरदारीची सूचना देण्यात आली होती. सुरगाणा, दिंडोरी, कळवण, सटाणा, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, इगतपुरी, नाशिक तालुक्यांत पावसाचा जोर राहिला.

...असा बरसला पाऊस
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार
- कोल्हापूर जिल्ह्यात पश्‍चिम भागात हलक्या सरी
- सातारा जिल्ह्यात हलका पाऊस
- पश्‍चिम विदर्भात जोर; मलकापूर तालुक्यात अतिवृष्टी

- जळगाव, धुळे जिल्ह्यात चांगला पाऊस
- नाशिकमध्ये ४४ मंडलांत अतिवृष्टी

राज्यात शनिवार (ता.९) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये : स्रोत ः कृषी विभाग
कोकण : शहापूर ९६, खर्डी ७२, बदलापूर ८०.५, वौशी ८५, खोपोली ६४.५, आटोने ७१.८, जांभूळपाडा ९७.५, पेण १०५.८, कामरली १०४.३, महाड ७९.५, नाटे १२४,
तुडली ७९.५, माणगाव, इंदापूर ९०, गोरेगाव, लोणेरे १०२.५, निजामपूर ९९.५, रोहा १४२.५, नागोठणे १०१.३, चानेरा, कोलाड ११९.५, पोलादपूर ८२.८, कोंडवी ७३.८,
वाकण ८२.८, मुरूड ८८.८, नंदगाव ९७.३, श्रीवर्धन, वालवटी ७१, बोरलीपंचटण ९४.३, म्हसळा, खामगाव ९३.८, तळा १२७, मेंढा १२९.३, चिपळूण १३८.५, खेर्डी १०६.५,
मार्गताम्हाणे २०७, रामपूर १८०.५, वहाळ ११२.५, सावर्डे ११८.५, असुर्डे १२१.८, कळकवणे १३९.५, शिरगाव १२६.५, दापोली, आंजर्ले, बुरोंडी १३२.५, दाभोळ १५२.८,
वाकवली १५४.५, वेळवी १३२.५, खेड १५४.५, शिर्शी १५३.३, कुळवंडी ९२, भरणे १०६.५, दाभीळ १११, धामणंद १०६, गुहागर १८७, तळवली १८६.५, पाटपन्हाळे १५१.८,
आबलोली १३३.३, हेदवी ८२, मंडणगड, म्हाप्रळ ७५, देव्हारे १३६, रत्नागिरी १५७, खेडशी १७०, पावस १३३, जयगड १४५.५, फसोप १४५.५, कोतवडे १३२, मालगुंड,
टेरव ११९, पाली १४६, कडवी ८७, मुरडव १०९, माखजन १०४, फुंणगुस ११८.८, फणसवणे ८७, आंगवली ८५, देवळे ७७.५, देवरूख ८२.८, तुळसानी ८९, माभळ १२५.३, तेर्ये ८७, राजापूर ११७.८,
सौंदळ १११.५, कोंडये १३०, जैतापूर ९८, कुंभवडे ११८, नाटे १०६, ओणी १२१, पाचल १११, लांजा १५५, भांबेड १२१, पुनस १५५, साटवली १६६, विलवडे १२१.५, पडेल ७५, शिरगाव ८३.३, पाटगाव १०४, बापर्डे ६९, नांदगाव ७१, तळेरे ९९, वैभववाडी ११५.३, येडगाव ११४.५, भुईबावडा ११५.३.

मध्य महाराष्ट्र : कळवण ९५, मोकभणगी ११३, कनाशी १२३, दळवट १५१, अभोणा १७७, उंबरठाणा ९०.३, बाऱ्हे ८४, बोरगाव ८२.५, सुरगाणा ९०.३, सातपूर ९३.५, गिरणारे ९२.३, पाथर्डी ९८.५, दिंडोरी ७८, मोहाडी ८२, उमराळे ९८, ननाशी ११२, कोशिंबे ८७,
कसबे वणी ९६.३, वरखेडा ७८, इगतपुरी ७७.५, वाडीवऱ्हे ९६.८, धारगाव ८४, पेठ, जागमोडी १०५, कोहोर ९८, दिघवद ७८, त्र्यंबकेश्‍वर १०७.८, वेळुंजे ९४.५, हरसूल ८६, ठानापाडा १०८, दाहेदेवडी १००.८,
नवागाव ८२.८, चिंचपाडा, विसरवाडी ९९.५, भुसावळ ७०.३, जामनेर ७९, नेरी ७०, वाकडी ८०, फत्तेपूर ८८, शेंदुर्णी ८८.३, पहूर ७६, तोंडापूर १०३, पाचोरा ७०,
पिंपळगाव ७८, वरखेडी ८०, कजगाव ७०, लोणावळा ७९, आंबेगाव ९३.३, महाबळेश्‍वर ९३, गगनबावडा ११५.

मराठवाडा : हरसूल ६३, डोणगाव ९७, आसेगाव ५०.८, नाचणवेल ५८.५, चिंचोली १०३.५, करंजखेड ६६.३, वेरूह ५०.५, गोळेगाव ६४.८, अजिंठा ११४.८,
आंभाई ७७, शिवना ७८.३, सोयगाव १५२.३, सावळदबारा ६४, बनोती ७३, जरांडी १०३.८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com