Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Nanded Heavy Rain : नांदेडला सहा तालुक्यासह तब्बल २१ मंडळात अतिवृष्टी

Nanded Rain Update : मागील २४ तासात सरासरी ५३.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तीन मंडळात शंभर मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला. या पावसामुळे खरिपातील पिकांना उभारी मिळाली आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात दीर्घ विश्रांतीनंतर मंगळवारी (ता. १८) दिवसभर झालेल्या दमदार पावसाने सहा तालुक्यासह तब्बल २१ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हा पाऊस सर्व १६ तालुक्यात सर्वदूर झाला. मागील २४ तासात सरासरी ५३.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तीन मंडळात शंभर मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला. या पावसामुळे खरिपातील पिकांना उभारी मिळाली आहे.

नांदेड जिल्ह्यात एक जून पासून पावसाला सुरुवात होते परंतु यंदा संपूर्ण जून महिना कोरडा गेला. यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला प्रारंभ केला. परंतु हा पाऊसही समाधानकारक नव्हता. केवळ पुढील पावसाचे असे वर शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू केली.

मध्यंतरी अनेक भागात पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांना पेरणीचे कामे थांबवावी लागली होती. यानंतर ठरावीक काळाने हलका पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू केली. परंतु या दीड महिन्याच्या काळात अद्याप मोठा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या.

अशांतच जिल्ह्यात मंगळवारी (ता. १८) सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस दिवसभर सुरू होता. दुपारनंतर पावसाने गती घेतली. यामुळे अनेक शेतामध्ये पावसाचे पाणी साचले होते. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यामध्ये झाला. या पावसाचे प्रमाण सर्वाधीक नांदेड, मुदखेड, धर्माबाद, उमरी, अर्धापूर या तालुक्यात राहिल्याने या तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली.

यासोबतच तब्बल २१ महसूल मंडळामध्ये ६५ मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टीची नोंद झाली. यातील नांदेड तालुक्यातील लिंबगाव उमरी तालुक्यातील गोळेगाव व उमरी या तीन महसूल मंडळात शंभर मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात पहिल्यांदाच झालेल्या सर्वदूर दमदार पाऊस झाल्यामुळे खरिपातील पिकांना उभारी मिळाली आहे. जिल्ह्यात बुधवारीही ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात ५३.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण २५८.६० मिलिमीटर नुसार वार्षिक सरासरीच्या २९.०१ टक्के पाऊस झाला आहे.

अतिवृष्टी झालेले मंडळ

नांदेड शहर ७६.५०, नांदेड ग्रामीण ७०.२५, विष्णुपुरी ६९.७५, लिंबगाव १५३.५०, नाळेश्वर ८८.२५, कुंडलवाडी ६७.७५, सोनखेड ८०.५०, माळाकोळी ७७, मोघाळी ९५.५०, मुदखेड ७६, मुगट ६५.२५, बारड ७०.२५, करखेली ९०.७५, जारीकोट ७९.२५, उमरी १२७.७५, गोळेगाव १३३.५०, सिंधी ५३.७५, धानोरा ६६, अर्धापूर ७६.५०, दाभड ८७.२५, मालेगाव ६९.७५.

तालुका निहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

नांदेड ७४.४०, बिलोली ५८.४०, मुखेड ३०, कंधार ३६.६०,लोहा ६१, हदगाव ३९.४०, भोकर ६८.१०, देगलूर ३०.५०, किनवट ४२, मुदखेड ७०.५०, हिमायतनगर ४६.८०, माहूर ३७.८०, धर्माबाद ७३.८०, उमरी १००.३०, अर्धापूर ७७.९०, नायगाव ५९.२०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT