Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Vidarbh Rain Update : पश्‍चिम विदर्भात पावसाचा जोर कायम

Latest Rain Update : गेल्या ४८ तासांपासून पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांतील बहुतांश तालुक्यात पाऊस सुरू आहे.

Team Agrowon

Akola News : गेल्या ४८ तासांपासून पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांतील बहुतांश तालुक्यात पाऊस सुरू आहे. शनिवारी (ता.९) सकाळी आठ वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार बुलडाण्यातील मलकापूर तालुक्यात सरासरी ७५ मिलिमीटर पाऊस झाला असून, तालुकाभर अतिवृष्टी झाली आहे. धरणगाव मंडलात विक्रमी ९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

बुलडाणा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस असून मलकापूर, सिंदखेडराजा, चिखली, बुलडाणा, नांदुरा, मोताळा, जळगाव जामोद आदी तालुक्यांत जोरदार पावसाने हजेरी दिली. उर्वरित तालुक्यातही कुठे रिमझिम, तर कुठे जोरदार पाऊस झाला. अकोला जिल्ह्यात अकोला व मूर्तिजापूर तालुके वगळता पातूर, बाळापूर, तेल्हारा, अकोट, बार्शीटाकळी तालुक्यांत चांगला पाऊस झालेला आहे. वाशीम जिल्ह्यात रिसोड, वाशीम तालुक्यांत पावसाचा जोर टिकून आहे.

मंडलनिहाय पडलेला पाऊस

अकोला जिल्हा ः मुंडगाव २०.८, कुटासा १८.८, तेल्हारा २७.३, माळेगाव बाजार २७.३, हिवरखेड ४०.५, अडगाव बुद्रुक २६, पाथर्डी ३१.५, पंचगव्हाण २७.३, बाळापूर २२.५, वाडेगाव १८, निंबा २५.५, पातूर १९, बाभूळगाव ३८.५, आलेगाव २५, सस्ती ३८.५, बार्शीटाकळी १६.३, महान ११.५, राजंदा ३४.८, धाबा ११.५.

बुलडाणा जिल्हा ः जळगाव ७४.५, जामोद ११, पिंपळगाव काळे १६.८, वडशिंगी ६७.८, आसलगाव ४०, सोनाळा ११.५, बावनबीर ११.५, पातुर्डा २८.५, कवठळ ५९.३, चिखली २८.३, अमडापूर ४८.५, उंद्री ४२, एकलारा २५.३, कोलारा २८, मेरा खुर्द ३९.३, हातणी १७.३, घोडप २९.३, पेठ ३४.८, शेलगाव आटोळ ४९.३, चांदई ३२.५, बुलडाणा ४२.८, रायपूर २३.५, धाड २३.३, पाडळी ५०.३, म्हसला ६४.३, साखळी बुद्रुक १९.८, देऊळघाट ५०.३, देऊळगावराजा शहर ३२, देऊळगावराजा ग्रामीण १८.८, तुळजापूर १८.८, मेहूणाराजा १७.५, अंढेरा ५४.३, मेहकर ३४, जानेफळ ३८.४, हिवरा आश्रम २४.८ शेलगाव देशमुख २७, डोणगाव २५.३, देऊळगावमाळी ३४.८, वरवंड ४५, लोणी ३४,

अंजनी बुद्रुक २०, नायगाव दत्तापूर ३४, कल्याणा ५१.८, सिंदखेडराजा २२.८, किनगावराजा १६.५, मलकापूर पांग्रा ३६.३, दुसरबीड २८.५, सोनोशी २२, शेंदूर्जन ४६.८, साखरखेर्डा २४.८, लोणार ३०.३, बिबी ३६.३, सुलतानपूर ३९.३, टिटवी ३४.३, हिरडव ३८, अंजनी खुर्द ३४.८, खामगाव ६३.५, पिंपळगाव राजा ५०.५, लाखनवाडा ३७, हिवरखेड ३७.५, काळेगाव २७.८, आवार ४६, अटाळी ५०.८, पळशी बुद्रुक ४२.३, अडगाव ४१.८, वझर २१.५, पारखेड ४४.३, जनुना ४९.५, शेगाव ४७.३,

माटरगाव १३.८, जलंब ३८.३, जवळा बुद्रुक ३५.३, मनसगाव २८.५, मलकापूर ९८, दाताळा ५४, नरवेल ६७.५, धरणगाव ९८, जांभूळधाबा ५९.८, मोताळा ५६.५, बोराखेडी २७.८, धामणगाव बढे २८, पिंप्री गवळी ४०.३, रोहिणखेड ४२, पिंपळगाव देवी ४०.५, शेलापूर ३०.५, नांदुरा ५७.३, वडनेर ५२.८, शेंबा ४०.५, निमगाव २२.५, चांदूरबिस्वा ५७.८, महाळुंगी ७१.

वाशीम जिल्हा ः वाशीम १६, पारडी टकमोर १५.३, ्नसिंग २७.५, राजगाव २७.५, नागठाणा १५, वारला २८.३, केकतउमरा ४३.८, कोंढाळा झांबरे १२.८, पार्डी आसारे १५, रिसोड ३६.८, भर जहागीर ४५.३, मोप ४५.३, वाकद ४७.५, केनवड २०.५, गोवर्धन २४.३, रिठद ४४.३, कवठा खुर्द ३६.५, शिरपूर १८.५, मेडशी २५, जऊळका २५.८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

SCROLL FOR NEXT