Nagar Rain Update : नगर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Latest Rain Update : नगर जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच पुरेसा पाऊस नाही. त्यात गेल्या महिनाभरापासून पावसाचा खंड झाला आहे.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Nagar News : जिल्ह्यात महिनाभराच्या खंडानंतर गुरुवारी (ता. ७) सायंकाळी सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अखेरची घटका मोजत असलेल्या खरिपाच्या पिकांना काहीसा आधार माळाला आहे.

मात्र अजूनही सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्यातील घाटघर परिसरात मात्र शुक्रवार (ता. ८) सकाळपर्यंत झालेल्या नोदींनुसार पावणेदहा इंच पाऊस झाला.

Rain Update
Maharashtra Rain Update : सर्वदूर पावसाने पिकांना संजीवनी

नगर जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच पुरेसा पाऊस नाही. त्यात गेल्या महिनाभरापासून पावसाचा खंड झाला आहे. त्याचा फटका खरीप पिकांना बसला असून, अनेक ठिकाणी खरिपाची पिके अखेरची घटका मोजत आहेत.

Rain Update
Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात पावसामुळे दिलासा

अशा परिस्थितीत दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण बदलले असून, शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी तसेच रात्री उशिरा पावसाने बहुतांश भागात हजेरी लावली. जिल्हा प्रशासनाकडे झालेल्या नोंदीनुसार केडगाव मंडलात २६, वाडेगव्हाणला १८, वडझिरेला ३४, निघोजला २५, वीरगाव मंडलात २७, समशेरपूर मंडलात २८, साकीरवाडी मंडलात २२, राजूर २४, शेंडी मंडलात २४, मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. इतर सर्वच मंडलांत पाऊस झाला, परंतु हा पाऊस अल्प होता. त्यामुळे जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

अकोले तालुक्याच्या पश्‍चिम भागातील घाटघरला १८८ मिलिमीटर पाऊस झाला. रतनवाडीला १७ मिलिमीटर व भंडारदऱ्याला २३ मिलिमीटर पाऊस झाला. भंडारदरा धरणातून विसर्ग बंद करण्यात आलेला असून, निळवंडे धरणातून १६०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. मुळा धरणात ८१ टक्के, तर निळवंडे धरणात ८३ टक्के पाणीसाठा झाला आहे. पाऊस नसल्याने धरणातील पाणीआवकही थंडावली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com