Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपले

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्याच्या बहुतांश भागाला बुधवारी (ता. ७) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्याच्या बहुतांश भागाला बुधवारी (ता. ७) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) झोडपून काढले. कणकवली तालुक्यातील तोंडवली, बावशी आणि नांदगाव परिसरात अतिवृष्टी (Excessive Rain) झाली. पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन पाणी काही घरांमध्ये शिरले. देवगड-निपाणी रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील काही गावांमध्ये रात्री साडेदहा वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. दरम्यान, गुरुवारी (ता. ८) सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते.

जिल्ह्याच्या बहुतांश भागात बुधवारी दुपारी चार वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. कणकवली तालुक्यातील बावशी, तोंडवली आणि नांदगाव या भागात अतिवृष्टी झाला. त्यामुळे या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. बावशी येथील तीन ते चार घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. देवगड-निपाणी मार्गावरील तोंडवली येथे रस्त्यावरून बराच वेळ पुराचे पाणी वाहत होते.

त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली. नांदगाव येथे देखील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. महामार्ग प्रधिकरणाने चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामांमुळे घरांमध्ये पाणी घुसल्याचा आरोप करत स्थानिकांनी मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे अर्धा तास महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. पावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. वैभववाडीतील वीजपुरवठा रात्री साडेदहाच्या सुमारास सुरळीत झाला.

गुरुवारी सकाळ ८.३० पर्यंत संपलेल्या २४ तासांत झालेला तालुकानिहाय पाऊस

तालुका पाऊस (मिमीमध्ये)

देवगड १३८.९

मालवण १३५.७

सावंतवाडी ११९.१

वेंगुर्ला १०७.२

कणकवली १२४.३

कुडाळ १३०

वैभववाडी १२६.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Sugarcane Protest: कोल्हापूरच्या शिरोळमध्ये ऊस आंदोलन पेटले, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Sugarcane Crushing Season: ‘द्वारकाधीश’चे ६ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Rabi Sowing: अहिल्यानगरमध्ये रब्बी पेरणी दहा टक्के

Cotton Procurement: शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करा

Poultry Exports: पोल्ट्री निर्यातीत दुपटीने वाढ, भारतीय अंड्यांना जगभरातून मोठी मागणी, युएई ठरला सर्वात मोठा खरेदीदार

SCROLL FOR NEXT